पाचही राज्यांच्या निवडणुकांचे निकाल (Election Result 2023) रविवार, ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी अपक्ष उमेदवार मोलाची भूमिका पार पाडू शकतात. हे लक्षात आल्यानंतर सर्वच अपक्ष उमेदवारांनी आपले भाव वाढविले आहेत. तसेच ज्याची चांगली डील असेल त्यालाच पाठींबा देण्याचे धोरण अपक्ष उमेदवारांनी अवलंबल्याचे राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये बघायला दिसून येत आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले आहेत. यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. 3 डिसेंबर रोजी चार राज्यांच्या विधानसभेचे निकाल हाती (Election Result 2023) येणार आहेत. आता निकालाच्या प्रतीक्षेत असणारे राजकीय पक्ष आपापल्या पक्षातील बंडखोर, अपक्ष आणि प्रबळ मानल्या जाणाऱ्या अन्य छोट्या पक्षांच्या उमेदवारांशी संपर्क साधत आहेत, अतितटीची लढत होऊन सत्तेच्या समीकरणासाठी गरज पडल्यास त्यांना सोबत घेता येईल, अनेक एक्झिट पोलने चारही राज्यांत अटीतटीची लढत होणार असल्याचे संकेत दिले होते. यामुळे सर्वच पक्ष आता सावध भूमिकेत दिसत आहेत.
मध्य प्रदेश आणि राजस्थानसह पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांचे भविष्य या अपक्ष उमेदवारांवर अवलंबून आहे. तसेच अपक्ष उमेदवाराचे नशिब फडफडण्याच्या मार्गावर आहे. या निवडणुकीत दुस—या किंवा तिस—या क्रमांकावर येणा—या अपक्ष उमेदवारांना लोकसभेच्या निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
(हेही वाचा December 2023 Financial Deadlines : आर्थिक नियोजनासाठी डिसेंबरमध्ये ‘या’ तारखांवर लक्ष ठेवा )
भाजप आणि कॉंग्रेससह संपूर्ण राजकीय पक्षांचे डोळे या निकालाकडे लागून आहे. एवढेच नव्हे तर, भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी अपक्ष उमेदवारांवर आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे. भाजप आणि कॉंग्रेसमधील सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी राज्यांच्या पदाधिका—यांना अशा अपक्ष उमेदवारांची यादी तयार करायला सांगितली आहे जे दुस—या किंवा तिस—या क्रमांकावर असतील. पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे कितीतरी नेत्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आहे. अशात, अपक्ष उमेदवार राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना मागे ढकलून दुस—या किंवा तिस—या क्रमांकावर येत असतील तर ते दुर्लक्ष करण्यासारखे नक्कीच नाही असे दोन्ही राष्ट्रीय पक्षांना वाटत आहे. अशा अपक्ष उमेदवारांची यादी तयार करायची आणि लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना पक्षाची उमेदवारी द्यायची अशी या पक्षांची योजना आहे.
अर्थात, बंडाचे निशाण फडकावून स्वत:ची क्षमता सिध्द करणा—या अपक्ष उमेदवारांना चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. या उमेदवारांना आगामी निवडणुकीत तिकीट द्यायचे किंवा पद देवून पक्षात आणले जाणार आहे. लोकसभेची आगामी निवडणूक भाजप आणि विरोधी पक्षांसाठी खूप महत्वाची आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही गटाची प्रतिष्ठा पणाला लावली जाणार आहे. अशात अपक्ष उमेदवारांच्या लोकप्रियतेचा उपयोग आपल्याबाजून करून घेण्याची योजना आहे.
Join Our WhatsApp Community