IPL Auction 2023 : आयपीएलच्या डिसेंबरमधील लिलावासाठी ११६६ खेळाडूंची नोंदणी

आयपीएलच्या पुढील हंगामासाठीचा लिलाव १९ डिसेंबरला दुबईत होणार आहे. या लिलावात लक्ष असेल त ट्रेव्हिस हेड, मिचेल स्टार्क आणि आणि पॅट कमिन्सवर. 

251
IPL Auction 2023 : आयपीएलच्या डिसेंबरमधील लिलावासाठी ११६६ खेळाडूंची नोंदणी
IPL Auction 2023 : आयपीएलच्या डिसेंबरमधील लिलावासाठी ११६६ खेळाडूंची नोंदणी
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या पुढील हंगामासाठीचा लिलाव १९ डिसेंबरला दुबईत होणार आहे. या लिलावात लक्ष असेल त ट्रेव्हिस हेड, मिचेल स्टार्क आणि आणि पॅट कमिन्सवर. (IPL Auction 2023)

आयपीएलच्या १९ डिसेंबरला होणाऱ्या लिलावाच्या केंद्रस्थानी असतील एकदिवसीय विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडू. पॅट कमिन्स, ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांनी आपली मूळ किंमत २ कोटी रुपये इतकी ठेवली आहे. लिलावात १,१६६ खेळाडूंनी नोंदणी केली आहे आणि या खेळाडूंची नावं सर्व फ्रँचाईजीना पाठवण्यात आली आहेत. (IPL Auction 2023)

संघांकडे ७७ जागा बाकी आहेत. यातील परदेशी खेळाडूंचा कोटा ३० जणांचा आहे आणि सगळ्या संघांकडे मिळून लिलावातल्या खरेदीसाठी २६२ कोटी रुपये शिल्लक आहेत. न्यूझीलंडचा धडाकेबाज रचिन रवींद्रने आपली मूळ किंमत ५० लाख रुपये ठेवली आहे. पण, रचिनचं वय आणि त्याची विश्वचषकातील कामगिरी लक्षात घेता त्याच्यावर संघांच्या उड्या पडणार हे नक्की आहे. त्यामुळे त्याची किंमत बोल लावताना १५ ते २० पट वाढू शकते. (IPL Auction 2023)

(हेही वाचा – Mohammed Shami Injury Update : मोहम्मद शामीच्या दुखऱ्या घोट्यावर मुंबईत उपचार सुरू)

भारताचे केदार जाधव आणि हर्षल पटेल हे दोन खेळाडू भारतीय संघात प्रवेश मिळवण्याच्या शर्यतीत मागे पडले आहेत. पण, आयपीएलमध्ये अजूनही त्यांची चलती आहे आणि केदार जाधवने तर आपली मूळ किंमत २ कोटी रुपये ठेवली आहे. उमेश यादव या तेज गोलंदाजानेही आपली किंमत २ कोटी रुपये ठेवली आहे. (IPL Auction 2023)

भारता विरुद्धच्या टी-२० मालिकेत शतक झळकवलेल्या जोस इंग्लिस, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि जोश हेझलवूड यांचा समावेशही पहिल्या फळीतील खेळाडूंमध्ये झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा उगवता तेज गोलंदाज गेराल्ड कोएत्झी आणि रॅसी व्हॅन देअर ड्युसेन यांच्यावरही संघांच्या उड्या पडणार हे नक्की आहे. श्रीलंकेचा वानिंदू हसरंगाला रॉयेल चॅलेंजर्स बंगळुरूने अलीकडे मुक्त केलं आहे. त्यामुळे त्याच्यावरही सगळ्याचं लक्ष असेल. (IPL Auction 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.