Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस २००४ मध्ये भाजपसोबत युती करणार होती; शरद पवारांची कबुली

200

कर्जत येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिरात खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट करताना ‘२००४ मध्येच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत युती करणार होती. याबाबत दिल्लीत बैठकाही झाल्या होत्या, जवळपास सर्व निश्चित झाले होते, अशी माहिती दिली. त्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी यात तथ्य असल्याचे सांगितले.

प्रफुल्ल पटेल त्यावेळी माझ्या घरी येऊन काही तास त्यांनी आपण भाजपसोबत गेले पाहिजे, असा आग्रही विषय मांडला. पण ती गोष्टी शक्य नाही असे मी त्यांना सांगितले. तुम्हाला जायचे असेल तर तुम्ही जाऊ शकता. यानंतर ते थांबले. पुढे त्यांचा निवडणुकीत पराभव झाला त्यावेळी पराभव होऊनसुद्धा पक्षाने त्यांनी केंद्रीय मंत्रिपद दिले, असेही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

(हेही वाचा I.N.D.I Alliance : ‘इंडी’ आघाडीच्या अडचणी वाढणार; मोईत्रा अहवाल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी होणार सादर)

काय म्हणाले प्रफुल पटेल? 

राष्ट्रवादीची २००४ मध्येच भाजपसोबत युती होणार होती. जागा वाटपही ठरले होते. पण त्यात त्यावेळी प्रमोद महाजन यांनी खोडा घातला.  राष्ट्रवादी काँग्रेस – शिवसेना- भाजप यांची युती करण्याचे तेव्हा ठरले होते. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि जसवंत सिंह यांच्या सूचनेवरून माझ्या घरी बैठक झाली होती. तिन्ही पक्षांनी प्रत्येकी १६ जागा लढवण्याचे ठरवले  होते. दिल्लीत जवळपास सर्व निश्चित झाले होते, असा गौप्यस्फोट पटेल यांनी केला. ही युती होणार म्हणून गोपीनाथ मुंडे खुश होते. परंतु चर्चेत मुंडे फारसे सहभागी नव्हते. प्रमोद महाजन यांना ही युती नको होती. कारण जर युती झाली असती, तर दिल्लीतील श्रेष्ठी शरद पवारांचे जास्त ऐकतील आणि आपले महत्त्व कमी होईल, असे त्यांना वाटत होते, असेही पटेल म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.