Mahila Bachat Gat : महिला बचत गटांना महापालिकेचे २५ हजार रुपयांचे अनुदान

मुंबईतील महिला बचत गटांना महापालिकेच्यावतीने जास्तीत जास्ती २५ हजार रुपये दिले जाणार असून प्रत्येक सभासदामागे २ हजार रुपये याप्रमाणे ही रक्कम दिली जाणार आहे.

7685
Mahila Bachat Gat : महिला बचत गटांना महापालिकेचे २५ हजार रुपयांचे अनुदान
Mahila Bachat Gat : महिला बचत गटांना महापालिकेचे २५ हजार रुपयांचे अनुदान

मुंबईतील महिला बचत गटांना महापालिकेच्यावतीने जास्तीत जास्ती २५ हजार रुपये दिले जाणार असून प्रत्येक सभासदामागे २ हजार रुपये याप्रमाणे ही रक्कम दिली जाणार आहे. बचत गटांची सभासद संख्या ही १० ते २० इतकी असल्याने त्यांना बचत गटाची स्थापना झाल्यानंतर एकदाच ही रक्कम स्वयंरोजगारासाठी खेळते भांडवल म्हणून महापालिकेच्यावतीने दिले जाणार असून याला महापालिका प्रशासकांची मंजुरी प्राप्त झाली आहे. (Mahila Bachat Gat)

मुंबईत अनेक विकासपुरक बाबी आणि कल्याणकारी योजना याविषयची कार्यवाही आणि अंमलबजावणी महापालिकेच्या नियोजन खात्याद्वारे केली जाते. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने ‘जेंडर बजेट’ अंतर्गत अनेक बाबींचे समन्वयनही याच खात्याद्वारे पार पाडले जाते. ‘जेंडर बजेट’ मध्ये महिला बचत गटांना खेळत्या भांडवलासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाचाही यात समावेश होतो. यामध्ये महिला बचत गटांना सक्षमीकरणासाठी हे खेळत भांडवल महिला बचत गटांना उपलब्ध करून दिले जाते. (Mahila Bachat Gat)

त्यानसार महिला व बाल कल्याण योजनेतंर्गत एकूण ९०८ बचत गटांना खेळते भांडवल म्हणून एकूण २ कोटी २७ लाख रुपयांचा निधीची आवश्यकता असून प्रति बचत गट २५ हजार रुपये याप्रमाणे हे अनुदान स्वरुपात देण्याकरताच्या खर्चास प्रशासकांनी मान्यता दिली आहे. (Mahila Bachat Gat)

तर राज्य व केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाच्या स्वयंसहाय्यता गटांना राज्य अभियान संचालकांमार्फत प्रत्येकी दहा हजार रुपयांचा फिरता निधी उपलब्ध करून दिला जातो. घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षा चालक, नाका कामगार आदींच्या स्वयंसहाय्यता बचत गट तयार करून या योजनेतंर्गत १० हजार रुपयांचे अनुदान राज्य अभियान संचालकांमार्फत देण्यात येत असल्याने उर्वरीत १५ हजार रुपयांचे अनुदान महापालिकेच्या जेंडर बजेट अतंर्गत उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे जेंडर बजेट अंतर्गत अभियानाच्या एकूण ५२० बचत गटांना हे अतिरिक्त खेळते भांडवल देण्यात येणार असून यासाठी ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. (Mahila Bachat Gat)

महिला बचत गटात कोणत्या महिलांचा समावेश

केशरी तथा पिवळ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत असलेल्या कुटुंबातील १८ वर्षांवरील महिलांना बचत गटात सहभागी होण्याची संधी असते. बचत गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सबलीकरण करता येण्याच्या उद्देशाने १० ते २० महिलांचा एक बचत गट स्थापन करता येवू शकतो. या बचत गटाने बचत खाते राष्ट्रीयकृत, सारस्वत बँक तथा दि ग्रेटर बॉम्बे को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये उघडण्यात आल्यानंतर ३ महिन्यांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर तसेच बचत गटाचे आर्थिक व्यवहार व इतर बाबींची पडताळणी मुल्यमापन केल्यानंतर महिला बचत गटास प्रति सभासद दोन हजार रुपये याप्रमाणे खेळते भांडवल म्हणून जास्तीत जास्त २५ हजारांपेक्षा जास्त नसेल एवढी रक्कम एकदाच दिली जाते. (Mahila Bachat Gat)

(हेही वाचा – Air Pollution : धुळीच्या प्रदुषणाच्या नियंत्रणाच पडल्या धुळखात, महापालिका उडवते केवळ घोषणांचे फवारे)

महिला किंवा पुरुषांचेही महिला बचत गट

तसेच शहरी गरीबांचे राहणीमान उंचावण्याच्या दृष्टीने १० ते २० सदस्य महिला किंवा पुरुष एकत्र येऊन स्वयंसहाय्यता गट स्थापन करु शकतात. हा गट नोंदणीकृत असणे आवश्यक नाही. अभियानांतर्गत प्रथम महिला सभासदांचे स्वयंसहाय्य गट स्थापन करणे आवश्यक राहिल. परंतु आवश्यकतेनुसार विकलांग पुरुषांचे गटही स्थापन करता येतात. हे समुह नागरी गरीबांना त्यांच्या आर्थिक व सामाजिक गरजांची पुर्तता करण्यासाठी काम करतील. सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेतंर्गत स्थापित महिला स्वयंसहाय्य गट किंवा समुहांचा यात समावेश असेल. (Mahila Bachat Gat)

कसा बनवू शकणार महिला बचत गट

जर आपल्या वसाहतीतील महिला एकत्र येत बचत गट बनवण्यासाठी तयार असतील तर त्यांनी महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयातील समाज विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. त्यानंतर नियोजन विभागाचे समुदाय संघटक हे आपल्या वस्तीमध्ये येऊन महिलांना बचत गट स्थापन करण्यासंदर्भात माहिती तथा मार्गदर्शन करतील तसेच सरकार आणि महापालिकेच्या महिलांसंदर्भातील स्वयरोजगाराच्या योजनांची माहिती देतील. त्यामुळे किमान दहा ते पंधरा महिलांच्या समुहांचा महिला बचत गट किंवा घरकामगार महिला, रिक्षा चालक, कुशल कामगार एकत्र येऊन बचत गट तयार करू शकतात. या बचत गटाचे अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार आदींच्या माध्यमातून बँकेत खाते उघडले जाईल. त्यानंतर या बचत गटांच्या बैठका आणि कामकाज पाहून त्यांना एकदाच २५ हजार रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध करून दिले जाते. (Mahila Bachat Gat)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.