Raj Thackeray : वडापाव पाहिल्यानंतर मला राज्य सरकारची आठवण येते- राज ठाकरे

राज ठाकरे बोलत असताना आपलं बालपण हे दादरच्या शिवाजी पार्क परिसरात गेल्याने त्या भागात असलेल्या कीर्तीचा वडापाव तसंच जिमखान्यातील खिडकी वडापाव बद्दल देखील त्यांनी बोलून दाखवले.

249
Raj Thackeray : वडापाव पाहिल्यानंतर मला राज्य सरकारची आठवण येते- राज ठाकरे
Raj Thackeray : वडापाव पाहिल्यानंतर मला राज्य सरकारची आठवण येते- राज ठाकरे

मुंबईच्या गोरेगाव येथे शनिवारी (०२ डिसेंबर) वडापाव महोत्सवात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वडापावची महती सांगत असताना मला सध्याच सरकार आणि वडापाव यामध्ये फार साम्य दिसून येत असल्याचे बोलून दाखवले. औचित्य होते वडापाव आणि लंडन मिसळ या नवीन चित्रपटाच्या कार्यक्रमाचे. (Raj Thackeray)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामधला वडा अजित पवार आहे, की अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यामधील वडा हा एकनाथ शिंदे आहे की त्या दोघांमधला वडा देवेंद्र फडणवीस आहेत, हेच कळत नाही. असे देखील मिश्किलपणे राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलून दाखवले. वडापावची संकल्पना आणलेल्याला महाराष्ट्र भूषण द्या असे देखील राज ठाकरे यांनी आपल्या मिश्किल भाषणात बोलून दाखवले. (Raj Thackeray)

(हेही वाचा – Ind vs Aus 4th T-20 : रायपूर क्रिकेट स्टेडिअमवर वीजच नाही, जनरेटरवर खेळवला सामना)

राज ठाकरे बोलत असताना आपलं बालपण हे दादरच्या शिवाजी पार्क परिसरात गेल्याने त्या भागात असलेल्या कीर्तीचा वडापाव तसंच जिमखान्यातील खिडकी वडापाव बद्दल देखील त्यांनी बोलून दाखवले. वडापाव ही संकल्पना आणणारे अशोक वैद्य यांची देखील यावेळेस त्यांनी आठवण काढली. भारतरत्न सचिन तेंडुलकर (Bharat Ratna Sachin Tendulkar) हे देखील वडापाव प्रेमी असल्याचा संदर्भ देत प्रॅक्टिसच्या वेळी त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर हेच स्टॅम्प वरती एक रुपया ठेवायचे आणि संध्याकाळपर्यंत तो नाही पडला तर ते तुझं बक्षीस म्हणून सोडून द्यायचे आणि त्याच एक रुपयात सचिन तेंडुलकर हे वडापाव खात असल्याचा देखील आठवण करून दिली. (Raj Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.