भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि चैत्यभूमी आदी ठिकाणी महापालिकेच्यावतीने जय्यत तयारी केली जात आहे. (Mahaparinirvan Din 2023)
महापालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदान जेवण व नाश्ता सह खाऊ वाटपाचे स्टॉल्स, राहण्यासाठीचे शामियाने, वैद्यकीय सुविधा, मोबाईल टॉयलेट आदींची व्यवस्था केली जात आहे. (Mahaparinirvan Din 2023)
मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दादर येथील चैत्यभूमीवर तसेच छत्रपती शिवाजी महाराज मैदान याठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने तयारीचा शनिवारी आढावा घेतला. (Mahaparinirvan Din 2023)
अनुयायांसाठी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान याठिकाणी निवारा, प्रकाश व्यवस्था, अन्नदान वितरण व्यवस्था, शौचालयाची सुविधा तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात करण्यात आलेल्या तयारीची त्यांनी पाहणी केली. (Mahaparinirvan Din 2023)
नियोजित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना डॉ. जोशी यांनी यंत्रणांना दिल्या. यावेळी परिमंडळ २ चे उपायुक्त रमाकांत बिरादार आणि जी उत्तर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (Mahaparinirvan Din 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community