भारत-बांगलादेश सीमेजवळून या वर्षात एकूण ७१६ घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. घुसखोरांमध्ये ११२ रोहिंग्या आणि ३१९ बांगलादेशींचा समावेश आहे.
सीमा सुरक्षा दलाने (BSF) ५९वा स्थापना दिवस साजरा केला. यावेळी बीएसएफ त्रिपुरा फ्रंटियर मुख्यालयाला संबोधित करताना उपमहानिरीक्षक आर के सिंग म्हणाले की, गेल्या वर्षी एकूण ३६९ लोकांना बेकायदेशीरपणे ईशान्येकडील राज्यांसह आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडताना पकडण्यात आले, ज्यात १५० बांगलादेशी, १६० भारतीय आणि ५९ रोहिंग्यांचा समावेश होता.
ते पुढे म्हणाले, ‘बीएसएफ (BSF) बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पहारा देत आहे, परिणामी त्यांनी २०२३ मध्ये घुसखोरी करताना ३१९ बांगलादेशी, ११२ रोहिंग्या आणि २८५ भारतीयांना पकडले आहे. यासोबतच यावर्षी बीएसएफने सीमेजवळून २३.१२ कोटी रुपयांचे अंमली पदार्थही जप्त केले आहेत. आरके सिंग आणि बीएसएफ सीमा रक्षकांचे बांगलादेशशी चांगले संबंध आहेत. प्रदेशात शांतता राखण्यासाठी योग्य पातळीवर नियमित चर्चा केली जाते. भारताच्या ईशान्य राज्याची बांगलादेशशी ८५६ किमी लांबीची सीमा आहे.