Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान मध्ये भाजप वरचढ ,काँग्रेसचीही घौडदौड सुरु

एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये भाजपला 100 ते 110 आणि काँग्रेसला(Congress) 90 ते 100 जागा मिळतील असा अंदाज आहे.

163
Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान मध्ये भाजप वरचढ ,काँग्रेसचीही घौडदौड सुरु
Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान मध्ये भाजप वरचढ ,काँग्रेसचीही घौडदौड सुरु

राजस्थानमध्ये (Rajasthan) (शनिवारी) म्हणजेच, 25 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या 199 जागांसाठी मतदान पार पडलं. काँग्रेस (Congress) उमेदवाराच्या निधनामुळं करणपूर विधानसभेची निवडणूक पुढं ढकलण्यात आली आहे.विधानसभेच्या 199 जागांसाठी 1 हजार 863 उमेदवार रिंगणात आहे, त्यांचं भवितव्य 5 कोटी 25 लाख 38 हजार 105 मतदारांनी मतदान पेटीत बंद केलं आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत(Ashok Gehlot) विरुद्द भाजपचे महेंद्रसिंह राठोड, उपमुख्यमंत्री सचिन पायलट विरुद्द भाजपचे अजित सिंह, भाजप नेत्या वसुंधरा राजे विरुद्ध काँग्रसचे रामलाल चौहान या प्रमुख लढती आहेत.

दरवर्षीप्रमाणेच राज्यातील सत्ता बदलणार की, राजस्थानची (Rajasthan) जनता पुन्हा काँग्रेसलाच(Congress) संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये भाजपला 100 ते 110 आणि काँग्रेसला(Congress) 90 ते 100 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर अपक्ष यांना 5 ते 10 जागा मिळतील असेही एक्झिट पोल सांगत आहे. राज्यात गेल्या २५ वर्षांपासून दरवर्षी सत्ता बदलते. त्यामुळे नक्की काय होणार हे येणाऱ्या निकालात स्पष्ट होईल.

(हेही वाचा : Assembly Election 2023 : मतमोजणीला सुरुवात; राजस्थानात भाजपची आघाडी)

टोंकमधून सचिन पायलट आघाडीवर आहेत. तर वसुंधरा राजे यांनी झालरापाटनमधून आघाडी घेतली आहे.

टोंक – सचिन पायलट (काँग्रेस) – आघाडीवर

झालरापाटन – वसुंधरा राजे (भाजप) – आघाडीवर

झोटवाडा – राज्यवर्धन राठोड (भाजप) – आघाडीवर

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.