CM Eknath Shinde यांनी स्वत: धुतले धारावीतील रस्ते!

279
CM Eknath Shinde यांनी स्वत: धुतले धारावीतील रस्ते!

एकीकडे सर्वत्र चार राज्यांच्या विधानपरिषद निवडणुकांची मतमोजणी सुरु असतांना दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी चक्क धारावीतील रस्ते धुतले.

मुंबई महापालिकेकडून डिसेंबर २०२३ आणि जानेवारी २०२४ या दोन महिन्‍यातील प्रत्‍येक शनिवारी परिमंडळातील एक प्रभाग निवडून व्‍यापक स्‍तरावर व सूक्ष्‍म पातळीवर(मायक्रो लेवल) संपूर्ण स्‍वच्‍छता (डीप क्लिनिंग) केली जाणार आहे. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असून या मोहिमेचा शुभारंभ येत्या रविवारी जी उत्तर विभागातील धारावी आणि डि विभागात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला.

मुख्यमंत्र्यांनी स्वत: रस्ते धुतले

एकीकडे सर्वत्र चार राज्यांच्या विधानपरिषद निवडणुकांची मतमोजणी सुरु असतांना दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी चक्क धारावीतील रस्ते धुतले. धारावी इथे मुख्यमंत्र्यांनी नालेसफाईची पाहाणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत स्वत: रस्त्यावर पाणी मारुन रस्ते स्वच्छ केले. मुंबई महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी स्वच्छता करत होते, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वत: पाईप हातात घेऊन, रस्त्यांवर पाणी मारत, रस्ते धुतले.

(हेही वाचा – Mumbai Fire : गिरगाव मध्ये चार मजली इमारतीला आग, दोघांचा मृत्यू)

मुख्यमंत्र्यांनी सकाळी सुरुवातीला शीव (सायन) येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेचे लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय (सायन हॉस्पिटल) येथील प्रवेशद्वार क्रमांक ७ जवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून या मोहिमेला सुरुवात केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सायन रूग्णालयात फिरून वैद्यकीय सेवेच्या सज्जतेची पाहणी केली. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री धारावी वस्तीकडे रवाना झाले.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?

“सायन रुग्णालयच्या आयसीयू आणि जनरल वॉर्डमध्ये पाहणी केली. २०० ICU आणि एक हजार बेड वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तीन हजारापेक्षा जास्त बेड वाढवले जातील. सहा महिन्याच्या आत हे काम पूर्ण होईल. तसेच सोनोग्राफी मशीन, डायलिसिस युनिट वाढवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर रुग्णालयाची स्वच्छता यावर भर देण्यास सांगितलं आहे,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की; “आज डीप क्लीन ड्राईव्ह या ठिकाणी सुरू झालेला आहे. आता इथून त्याची सुरुवात झाली आता धारावीमध्ये अनेक जे आपले 24 विभाग आहेत, या 24 विभागांमध्ये शनिवार आणि रविवार किंबहुना आठवड्यातून एकदा करण्याचा प्रयत्न आपला आहे, म्हणजे मॅनपावर जी आहे या रस्त्यावर दोनशे लोक काम करतात, शंभर लोक काम करतात. तेवढ्यावर अवलंबून न राहता आजूबाजूचे चार पाच वॉर्ड एकत्र करून त्यांची सगळी मॅनपावर या संपूर्ण परिसरामध्ये एकत्र करून रस्ते स्वच्छ करणे त्याच्यावरती माती काढणं, सफाई करणं गटर सफाई करणे, हे काम सुरु आहे,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

(हेही वाचा – Assembly Election 2023 : छत्तीसगढमध्ये भाजप आघाडीवर)

‘डीप क्लिनिंग’ मोहीम

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे महत्व जाणून संपूर्ण देशभरात स्वच्छता मोहीमेला सुरुवात केली आहे. स्‍वच्‍छता मोहिमेस व्यापक लोकचळवळीचे स्‍वरूप प्राप्‍त करण्यासाठी मुंबईकर नागरिकांनी या लोकचळवळीत सहभागी व्हावे असेही आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनांनुसार मुंबईकरांची वायू प्रदूषणापासून सुटका करण्‍यासाठी मुंबई महानगरपालिका प्रभावीपणे विविध उपाययोजना राबवत आहे. महानगरपालिकेचे अधिकारी – कर्मचारी, कामगार रस्‍त्‍यावर उतरुन अहोरात्र कार्यरत आहेत. रस्‍ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणी धूळ हटवून पाण्याने धुण्‍याचे काम अखंडपणे सुरू आहे. त्‍याही पुढे जात आता ‘डीप क्लिनिंग’ मोहीम राबविण्‍याचा संकल्‍प महानगरपालिकेने केला असल्याचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.