जगातील सर्वात महागड्या क्रिकेट लीगचा लिलाव कुठे आणि कधी होणार याबाबत उत्सुकता आता संपली आहे. इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) लिलाव (IPL Auction 2024 Date) येत्या मंगळवार, 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच विदेशात म्हणजेच दुबईमध्ये हा लिलाव होणार आहे.
आयपीएलच्या (IPL Auction 2024 Date) दहा संघांकडे कायम ठेवलेल्या आणि न घेतलेल्या खेळाडूंची अंतिम यादी सादर करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ होता.
(हेही वाचा – CM Eknath Shinde यांनी स्वत: धुतले धारावीतील रस्ते!)
आयपीएल 2024 च्या हंगामात (IPL Auction 2024 Date) रोस्टर तयार करण्यासाठी प्रत्येक संघाला तब्बल 100 कोटी रुपये (अंदाजे 12.02 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) मिळतील, जी मागील हंगामाच्या 5 कोटींनी वाढली आहे. मागच्या आयपीएल हंगामात रोस्टर तयार करण्यासाठी प्रत्येक संघाला 95 कोटी रुपये मिळाले होते. लिलावाच्या दिवशी प्रत्येक संघाने किती रक्कम खर्च केली पाहिजे हे त्यांनी सोडणाऱ्या खेळाडूंच्या मूल्यानुसार तसेच 2023 च्या लिलावातील त्यांच्या न वापरलेल्या पर्सवर अवलंबून असते.
अनेक खेळाडूंची आयपीएल लिलावासाठी नोंदणी
आयपीएल 2024 साठी खेळाडूंच्या लिलावासाठी एकूण 1166 खेळाडूंनी नोंदणी केल्याची माहिती अहवालानुसार समोर आली आहे. यंदाच्या आयपीएल लिलावासाठी 830 भारतीय खेळाडूंनी नोंदणी केली असून याशिवाय 336 परदेशी खेळाडूंनीही नोंदणी केली आहे. यापैकी 212 खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. सध्या आयपीएलमधील सर्व संघांची परिस्थिती लक्षात घेता, आणखी फक्त 70 खेळाडूंची निवड केली जाऊ शकते, त्यापैकी केवळ 30 स्लॉट विदेशी खेळाडूंसाठी उपलब्ध आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community