2017 मध्ये भारत आणि चीनमधील डोकलाम (Doklam) वादाच्या वेळी पश्चिम भूतानजवळील सिलीगुडी कॉरिडॉरने (Siliguri Corridor) महत्त्वाची भूमिका बजावली होती. (China Roads In Bhutan) यानंतर भूतानच्या उत्तरेकडील भागाजवळ चीन वेगाने पायाभूत सुविधांचा विकास करत असल्याचे सॅटेलाइट इमेजमधून समोर आले आहे. ब्रिटनच्या थिंक टँक चॅथम हाऊसने (रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेयर्स) हा खुलासा केला आहे.
(हेही वाचा – Assembly Election 2023 : ‘एक अकेला सब पर भारी !’ स्मृती इराणींचं ट्विट चर्चेत)
भूतानमध्ये चीनचे रस्त्यांचे जाळे
भूतानच्या (Bhutan) बेयुल खोऱ्यात चीनने रस्त्यांचे जाळे विणले आहे. अनेक लष्करी चौक्याही बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे भूतानचे जकारलुंग खोरे आगामी काळात चीनच्या ताब्यात जाऊ शकते. या भागातील बहुतेक लोक तिबेटी (Tibet) बौद्ध धर्माचे पालन करतात. भूतान चीनच्या शक्तीपुढे गुडघे टेकताना दिसत आहे. भूतानमधील अधिकारी तेनझिंग लामसांग म्हणतात की, भूतान चीनच्या कृतीवर मौन बाळगण्याची आपली जुनी रणनीती कायम ठेवेल. (China Roads In Bhutan)
चीन-भूतान सीमा निश्चित करणार – भूतानचे परराष्ट्रमंत्री
बेयुल व्यतिरिक्त भूतानच्या मेनचुमा व्हॅलीमध्येही (Menchuma Valley) चिनी बांधकाम दिसून आले आहे. 2021 मध्ये काही काळ चीनने या खोऱ्यावर कब्जा केला होता. भूतानच्या रॉयल आर्मीने याला नकार दिला आहे. बेयुल आणि मेनचुमा येथेही चिनी लिबरेशन आर्मी (Chinese Liberation Army) स्टेशन आहेत. भूतानचे परराष्ट्रमंत्री तांडी दोरजी यांनी बीजिंगमध्ये चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली. तेव्हा दोन्ही देशांनी आपापल्या सीमा निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा – Assembly Election 2023 : भाजपच्या दिल्ली मुख्यालयात उत्साहाचे वातावरण)
चीनने यापूर्वीही भूतानच्या भागात रस्ते बांधण्याचा प्रयत्न केला होता. 2017 मध्ये चीनने दक्षिण-पश्चिम डोकलाममध्ये (Doklam) रस्ता बांधण्याचा प्रयत्न केला. येथे त्यांची भारतीय जवानांशी चकमक झाली. (China Roads In Bhutan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community