Assembly Election 2023 Result : भाजपची 3 राज्यांत आगेकूच; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

274

देशातील ४ राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालात (Assembly Election 2023 Result) भाजपाला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत आगेकूच सुरु आहे, त्यावर आता भाजपचे नेते आनंदोत्सव साजरा करत आहेत. या तीन राज्यांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जाऊन प्रचार केला होता. निकालाच्या दिवशी फडणवीस यांनी थोडक्यात प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले फडणवीस? 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालानंतर (Assembly Election 2023 Result) प्रतिक्रिया दिली आहे. निकालावर मी यावर सविस्तर बोलेन, ‘मी आत्ता एवढेच सांगेन, मी आनंदी आहे, यावर मी सविस्तर बोलेन. तसेच, विकास आणि विश्वास, देश केवल मोदीजी के साथ, अशीही प्रतिक्रिया फडणवीसांनी ट्विटरवरुन दिली आहे.

(हेही वाचा Assembly Election 2023 : तीन राज्यांमध्ये भाजप आघाडीवर)

काय आहे निकाल? 

मध्य प्रदेशमध्ये भाजपाने मोठी मुसंडी मारली असून भाजपाने १५० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत येथील विजय निश्चित केला आहे. तर, राजस्थानमध्ये सुरुवातीला काँग्रेसने आघाडी घेतली होती. मात्र, काही वेळातच हे चित्र बदलले असून भाजपाने ११० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे, राजस्थानमध्येही पायलट व गेहलोत यांचे विमान हेलकावे खात असल्याचे दिसून येतं. विशेष म्हणजे छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार असून तिथे काँग्रेस सत्ता राखेल असा अंदाज होता. अनेक एक्झिट पोलमधूनही छत्तीसगडमध्ये काँग्रेसला बहुमत दिसून आले. मात्र, दुपारची आकडेवारी पाहिल्यानंतर येथेही भाजपाचे कमळ खुलल्याचे दिसून येत आहे. या निकालानंतर भाजपा नेत्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीयमंत्री ज्योतिर्रादित्य शिंदे यांनीही प्रतिक्रिया देत एमपीच्या मनात मोदीच असल्याचे म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.