Assembly Election 2023 Result : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडच्या ‘विजया’ने ‘ब्रँड मोदी’ मजबूत; 2018 मधून धडा घेतला आणि सत्ता आली

247

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपसाठी आनंदाची बातमी आली आहे. मध्य प्रदेशात भाजपला पुन्हा एकदा मोठे बहुमत (Assembly Election 2023 Result) मिळताना दिसत आहे. त्याचवेळी राजस्थानमध्येही भाजप पाच वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येताना दिसत आहे. छत्तीसगडमध्येही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजपची कामगिरी चांगली असल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री पदाचे उमेदवार घोषित करण्याचे टाळले

तिन्ही राज्यांमध्ये भाजपने काही महिन्यांपूर्वी निवडणुकीसाठी तिकीट वाटप केले होते, मात्र कोणत्याही राज्यात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. तर, 2018 मध्ये भाजपने मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान, राजस्थानमध्ये वसुंधरा राजे आणि छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. परिणामी तिन्ही राज्यात भाजपचा पराभव झाला. मात्र यावेळी भाजपने तसे केले नाही. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोंडावर निवडणूक लढवली आणि त्याचा मोठा परिणामही दिसून येत आहे.

(हेही वाचा Assembly Election 2023 Result : भाजपची 3 राज्यांत आगेकूच; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?)

पंतप्रधान मोदींचाच महीमा

हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांमध्ये मोदींनी अनेक रॅली, रोड शो केले. भाजपनं निवडणूक प्रचार मोदींच्या अवतीभवती ठेवला. मध्य प्रदेशात ‘एमपी के मन में मोदी है’ आणि राजस्थानात ‘मोदी साथे अपनो राजस्थान’ अशा घोषणा दिल्या. तीन राज्यांमध्ये मोदींनी २ ते २७ नोव्हेंबर दरम्यान ४२ रॅली आणि ४ मोठे रोड शो केले. सर्वाधिक जोर मध्य प्रदेश, राजस्थानात लावण्यात आला. मध्य प्रदेशात मोदींनी १५ रॅली केल्या. इंदूरमध्ये मोठा रोड शो केला. राजस्थानात १५ रॅली केल्या. जयपूर आणि बिकानेरमध्ये रोड शो केले. तर छत्तीसगढमध्ये मोदींनी चार रॅली केल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.