CM Eknath Shinde : आता ‘मन मन मोदी’ असा निकाल…

मोदींचा करिष्मा संपला असं काही लोक म्हणत होते. मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. जनतेनं या निवडणुकांमध्ये साथ दिली.

258
CM Eknath Shinde : आता 'मन मन मोदी' असा निकाल...
CM Eknath Shinde : आता 'मन मन मोदी' असा निकाल...

कर्नाटक आणि राजस्थानमध्ये काँग्रेसनं आश्वासनं दिली पण ती पूर्ण केली नाहीत, त्यामुळे येत्या काळात जनतासुद्धा काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) केली. घर घर मोदी म्हटलं जायचं पण आता ‘मन मन मोदी’ असे निकाल लागलेत, मोदी लोकप्रियतेत पहिल्या नंबरवर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं, असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.(CM Eknath Shinde)

एकनाथ शिंदे म्हणाले, मोदींचा करिष्मा संपला असं काही लोक म्हणत होते. मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. जनतेनं या निवडणुकांमध्ये मोदींना साथ दिली. मोदी लोकांमध्ये असलेली लोकप्रियता ते लोकप्रियतेत एक नंबरवर आहेत हे पुन्हा सिद्ध झालं. राहुल गांधींनी परदेशात देशाला बदनाम केलं. मोदींना हरवण्यासाठी इंडिया आघाडी एकत्र आली आहे. 2024 मध्ये इंडिया आघाडीचे पानिपत होईल. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा : BRS Telangana : तुष्टीकरणाच्या राजकारणाला घरचा आहेर; तेलंगाणातच बसला मोठा फटका)

जनता काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही
राहुल गांधी यांनी राजस्थानमध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. कर्ज माफ करू असे आश्वासन दिले ते पूर्ण केले नाही. कर्नाटकमध्ये देखील असे आश्वासन दिले पण ते पूर्ण केले नाही त्यामुळे येणाऱ्या काळात देखील जनता काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असेही  एकनाथ शिंदे म्हणाले.

आगामी निवडणुकांमध्ये आघाडीचे पानीपत होणार : मुख्यमंत्री
2014 मध्ये मोदींवर नको नको ते आरोप केले पण मोदी निवडून आले. 2019 मध्ये चौकीदार चोर आहे असे आरोप केले पण मोदी निवडून आले. आता मोदीं विरोधात देखील इंडिया आघाडी एकत्र आली आहे पण मोदी निवडून येतील. येणाऱ्या निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीचे पानीपत होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.