Assembly Election 2023 Result : …म्हणून राजस्थानमध्ये भाजपने दिला काँग्रेसला धोबीपछाड

241

राजस्थान विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2023 Result) भाजपने काँग्रेसला धोबीपछाड दिला. या राज्यात सीटिंग आमदारांना तिकीट न देता बऱ्याच ठिकाणी नव्यांना संधी दिली. त्याच वेळी खासदारांनाही उमेदवारी दिली. ज्याचा अचूक परिणाम भाजपाला पाहायला मिळाला. निवडणुकीच्या काळात तिकीट वाटपात भाजपाची ही योजना अतिशय योग्य ठरली.

  • झोटवाडा विधानसभा मतदारसंघातून राज्यवर्धन सिंह राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच दिया कुमारी यांना विद्याधर नगर, बाबा बालकनाथ तिजारा, डॉ. किरोरीलाल मीना सवाई माधोपूर, भगीरथ चौधरी किशनगड, देवजी पटेल संचोर आणि नरेंद्र कुमार खेकर यांना मांडवा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
  • राज्यवर्धन सिंह राठौर: खासदार राज्यवर्धन राठोड जयपूरच्या झोटवाडामधून लढत आहेत. राठौर हे जयपूर ग्रामीणचे खासदार आणि माहिती व प्रसारण राज्यमंत्री आहेत. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार राज्यवर्धन 600 मतांनी पिछाडीवर आहे. येथे काँग्रेसचे अभिषेक चौधरी आघाडीवर आहेत.
  • दिया कुमारी : भाजपने दीयाकुमारी यांना विद्याधर नगरमधून मैदानात उतरविले आहे. ही जागा जयपूर जिल्ह्यात येते. राजसमंद खासदार दीयाकुमारी  जयपूरचे महाराजा सवाई सिंह आणि महाराणी पद्मिनी देवी यांची कन्या आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार दिया 42 हजार मतांनी आघाडीवर आहे.
  • बाबा बालकनाथ : भाजपने बाबा बालकनाथ यांना तिजारा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. बालकनाथ हे सध्या अलवरचे खासदार आहेत आणि बाबा मस्तनाथ विद्यापीठाचे कुलपती आहेत. ते नाथ संप्रदायाचे आठवे प्रमुख महंत होय. आतापर्यंत ते 11 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
  • डॉ. किरोरीलाल मीना: राज्यसभेचे खासदार डॉ. किरोडीलाल मीना सवाई माधोपूर मतदारसंघातून लढत आहेत. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार मीना सात हजार मतांनी आघाडीवर आहेत.
  • भगीरथ चौधरी : किशनगडचे खासदार चौधरी हेही मैदानात आहेत. सध्या ते १७ हजार मतांनी मागे पडून तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
  • देवजी पटेल : देवजी पटेल सांचोरमधून मैदानात आहेत. ही जागा जालोर जिल्ह्यात येते. देवजी पटले जालोरचे तिसऱ्यांदा खासदार निवडून आले होते.  हे सिरोही लोकसभा मतदारसंघातून आहेत. यावेळीही ते २५ हजार मतांनी मागे असून तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
  • नरेंद्र कुमार खिचड: भाजपने नरेंद्र खिचड यांना मांडवामधून उमेदवारी दिली आहे. ही जागा झुंझुनू जिल्ह्यात येते. ते येथूनच खासदारही आहेत. त्यांना या  भागात ‘प्रधानजी’ म्हणून ओळले जाते. सध्या ते १० हजार मतांनी पिछाडीवर आहेत.

(हेही वाचा Assembly Election 2023 Result : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडच्या ‘विजया’ने ‘ब्रँड मोदी’ मजबूत; 2018 मधून धडा घेतला आणि सत्ता आली)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.