Assembly Election 2023 Result : छत्तीसगडमध्ये भाजपच्या चार खासदारांचा बोलबाला

224
उत्तर प्रदेशात BJP का हरली? भाजपा टास्क फोर्सच्या अहवालात आले समोर
भाजपने विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपाच्या वेळी वेगळी रणनीती ठरवली. त्यानुसार खासदारांना उमेदवारी देऊन त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. छत्तीसगडमध्येही भाजपच्या याच धोरणाचा चांगला परिणाम होताना दिसला. या छोट्या राज्यात भाजपने ४ खासदारांना विधानसभेत उभे केले. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला, या चारही खासदारांनी जोरदार मुसंडी मारली.
  • छत्तीसगड विधानसभेच्या 90 जागांसाठी दोन टप्प्यात निवडणुका झाल्या. पहिल्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला 20 जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात 17 नोव्हेंबरला 70 जागांवर मतदान झाले. भाजपने आपले चार खासदार येथे उभे केले होते. त्यांचे काय झाले ते जाणून घेऊया…

    रेणुका सिंह (भरतपूर-सोनहाट): केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंह सुरगुजा लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्या 2003 मध्ये आमदार होत्या. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर परिसरात त्यांचा जनाधार वाढला. 2003, 2008 मध्ये त्या प्रेम नगर मतदारसंघातून आमदारही होत्या. आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये त्या 2600 मतांनी आघाडीवर आहेत.

    गोमती साई (पाठळगाव): गोमती साई या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. भाजपने त्यांना पाथळगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांची स्पर्धा काँग्रेसच्या रामपुकरसिंह ठाकूर यांच्याशी आहे.  आतापर्यंत गोमती नऊ हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.

    अरुण साओ (लोर्मी): बिलासपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अरूण साओ भाजपचे प्रदेशाध्यक्षही आहेत. लोर्मीमधून अरुण साओ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बिलासपूरचे खासदार असल्याने साओ यांचा अनेक जागांवर प्रभाव आहे, त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली. सध्या ते 11 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

    विजय बघेल (पाटण): विजय बघेल 2019 मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. दुर्ग लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले. याआधी त्यांनी तीनवेळा विधानसभा निवडणूकही लढवली होती. यावेळी पक्षाने त्यांना त्यांचे काका आणि राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या विरोधात उभे केले आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार विजय 2400 मतांनी पिछाडीवर आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.