Assembly Election 2023 Result : मुंबईत भाजपच्या वतीने जोरदार जल्लोष; मिठाई वाटून व्यक्त केला आनंद

Assembly Election 2023 Result : काँग्रेसला आजच्या निकालानंतर कळले असेल की, पनौती कोण आणि चुनौती कोण? अशा शब्दात आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केला.

215
Assembly Election 2023 Result : मुंबईत भाजपच्या वतीने जोरदार जल्लोष; मिठाई वाटून व्यक्त केला आनंद
Assembly Election 2023 Result : मुंबईत भाजपच्या वतीने जोरदार जल्लोष; मिठाई वाटून व्यक्त केला आनंद

मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan) आणि छत्तीसगड (Chhattisgarh) या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व विजयाचा मुंबईत (mumbai bjp) भाजपच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला. ढोल ताशांचा गजर करीत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या जयजयकार करणाऱ्या घोषणा देत, मिठाई वाटून भाजपच्या कार्यकर्त्यांनी रविवारी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या उपस्थितीत विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. (Assembly Election 2023 Result )

(हेही वाचा – Assembly Election Result 2023 : भाजपची रणनीति कॉंग्रेसची दाणादाण उडाली)

देशातील गरिब, श्रमिक, शेतकरी, कष्टकऱ्यांची सेवक म्हणून सेवा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला आजच्या निकालानंतर कळले असेल की, पनौती कोण आणि चुनौती कोण? अशा शब्दात आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी यावेळी जोरदार हल्लाबोल केला.

चार राज्याच्या निकालामध्ये जनतेने द्वेषाचे राजकारण करणाऱ्या काँग्रेस आणि इंडिया आघाडीला झिडकारून जनसेवा करणाऱ्या भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कणखर नेतृत्व, अमित शाह (Amit Shah) यांची रणनीती आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी केलेली व्यूहरचना तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत याचे हे यश आहे. हा विजय आम्ही नम्रपणे स्वीकारला आहे, असे शेलार म्हणाले. या निवडणुकीत मेहनत घेणाऱ्या कार्यकर्ते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचेही शेलार अभिनंदन केले.

(हेही वाचा – Assembly Election 2023 Result : पंतप्रधान मोदींबद्दल अपशब्द बोलणे जनतेला मान्य नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना टोला )

यावेळी आमदार प्रवीण दरेकर, प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ, माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार राज पुरोहित, अतुल शाह यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (Assembly Election 2023 Result)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.