मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan) आणि छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने काँग्रेसवर टीका केली. या तीनही राज्यांत भाजप मोठ्या प्रमाणात आघाडीवर आहे. त्यामुळे काॅंग्रेसवर सर्व स्तरांतून टीका होत आहे. (Assembly Election 2023 Result)
भारताने क्रिकेट विश्वचषक हारल्यानंतर काॅंग्रेसचे युवराज राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांना ‘पनौती’ म्हणून हिणवले होते. राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी राहुल गांधी म्हणाले होते, “भारतीय संघ चांगला खेळत होता, पण पनौतीने भारताला पराभूत केले.”
(हेही वाचा – Assembly Election 2023 Result : आज कळले ना मर्द कोण; भाजपच्या आशिष शेलार यांचा ठाकरे गटावर निशाणा)
पनौती कोण आहे ?
आता विधानसभा निवडणुकांमध्ये काॅंग्रेसच्या मतदानाचा टक्का घसरल्यानंतर ‘पनौती नेमके कोण आहे’, हे अनेकांकडून विचारले जात आहे. यात पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने काँग्रेसवर (Congress) टीका केली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने सोशल मीडिया ‘एक्स’वर विचारले आहे की, ‘पनौती कोण आहे ?’
Panauti kaun? 😂
— Danish Kaneria (@DanishKaneria61) December 3, 2023
मूळ भारतीय आहे दानिश कनेरिया
दानिश कनेरिया हा भारतीय वंशाचा माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू (pakistani cricketer) आहे. पाकिस्तानमध्ये त्याच्यावर धर्मांतर करण्यासाठी अनेक वेळा दबाव आणण्यात आला. तो मुसलमान नसल्यामुळे त्याला त्याच्या कारकीर्दीत अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. एका मुलाखतीत कनेरियाला विचारले गेले की, ‘त्याने इस्लाम धर्म स्वीकारला असता तर त्याचे जीवन आणि क्रिकेट कारकीर्द कशी असती ?’.
(हेही वाचा – Assembly Election 2023 Result : मुंबईत भाजपच्या वतीने जोरदार जल्लोष; मिठाई वाटून व्यक्त केला आनंद)
दानिश कनेरिया म्हणाला, “मला ज्या समस्येचा सामना करावा लागत आहे, त्या कदाचित आल्या नसत्या. मी कदाचित कॅप्टन झालो असतो. मी अनेक विक्रम मोडले असते. मी इस्लाम (Islam) स्वीकारण्याचा विचारही करू शकत नाही. इतके अध:पतन माझ्यासाठी अशक्य आहे. मला सनातन धर्म खूप आवडतो. माझ्यासाठी धर्म हाच सर्वकाही आहे. मला रोजगार न मिळू दे, मला अन्य काहीही न मिळू दे; पण माझा धर्म माझ्यासोबत आहे, हेच माझ्यासाठी सर्वकाही आहे. मी सर्वांना सांगेन की, धर्माशी कधीही तडजोड करू नका. धर्म हाच सर्व काही आहे. मला धर्मांतर करायला खूप वेळा सांगितले गेले. मी म्हटले जय श्रीराम !” (Assembly Election 2023 Result )
हेही पहा –