Raja Singh : तेलंगणामध्ये भाजपच्या राजा सिंह यांचा विजय

673

तेलंगणातील भाजपाचे प्रखर हिंदुत्ववादी नेते अशी ओळख असलेले टी. राजा सिंह (Raja Singh) हे तेलंगणाच्या गोशामहल या मतदारसंघात २१ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. राजा सिंह हे प्रखर हिंदुत्ववादी विचार मांडत असतात. टी राजा सिंह यांनी प्रेषिताच्या विरोधात वक्तव्य केले होते. त्यामुळे वर्षभरापूर्वी त्यांना तेलंगणा भाजपामधून निलंबित करण्यात आले होते. परंतु, वर्षभर पक्षापासून लांब ठेवल्यानंतर भाजपाने दोन महिन्यांपूर्वी टी. राजा सिंह यांचे पुनर्वसन केले. भाजपाने त्यांना गोशामहल या मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली. दरम्यान, राजा सिंह यांनी पक्षाचा विश्वास सार्थ ठरवला आहे. ८०,१८२ मतांसह ते विजयी झाले.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात राजा सिंह (Raja Singh) यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये त्यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर हैदराबाद पोलिसांनी त्यांना अटकही केली होती. त्यानंतर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना पक्षातून निलंबित केले. राजा सिंह यांचे वक्तव्य पक्षाच्या घटनेविरोधात असल्याने त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावण्यात आली होती. हैदराबाद येथे स्टॅण्डअप कॉमेडियन मुन्नवर फारूकी याचा कार्यक्रम होणार होता. त्याआधी राजा सिंह यांनी समाज माध्यमांवर एक व्हिडीओ प्रसारित करून, फारूकीवर टीका केली होती. आपण पोस्ट केलेला व्हिडीओ मनोरंजनासाठी असून, त्यात कुठेही प्रेषितांचा उल्लेख केला नव्हता, अशी भूमिका राजा सिंह यांनी घेतली. हैदराबाद येथे मुस्लीम संघटनांनी त्यांच्याविरोधात आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली. राजा सिंह यांनी या नोटिशीला तुरुंगातूनच उत्तर दिले. फारुकीने हिंदू देवतांविरोधात वक्तव्य केल्यामुळे काही ठिकाणी धार्मिक तणाव निर्माण झाला होता. याचा उल्लेखही सिंह यांनी त्यांच्या उत्तरात केला होता.

(हेही वाचा Assembly Election 2023 Result : चारही राज्यांत भाजपचा वाढला जनाधार; कोणत्या राज्यात मतांच्या टक्क्यांत किती झाली वाढ?)

कोण आहेत टी. राजा सिंह?

टी. राजा सिंह (Raja Singh) तेलंगणातील गोशामहल या मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. नुकतीच त्यांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे. ते राजा भैया किंवा टायगर भैया या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा मतदारसंघ आणि हैदराबाद परिसरात ते लोकप्रिय आहेत. कट्टर गोरक्षक ही त्यांची ओळख आहे. बजरंग दलचे सदस्य असलेले सिंह २००९ साली राजकारणात उतरले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.