Congress : सनातन धर्माला विरोध केल्यामुळेच काँग्रेसचा पराभव; काँग्रेसचे नेते प्रमोद कृष्णम् यांचा घरचा अहेर

432

भारत भावनाप्रधान देश आहे. सनातन धर्माला केलेल्या विरोधामुळे काँग्रेस (Congress) पक्ष बुडाला. आम्ही सनातन धर्माला विरोध केल्यामुळे पराभूत झालो, यात तथ्य आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद कृष्णम् यांनी ३ राज्यांत काँग्रेसच्या झालेल्या पराभवावरून पक्षाला घरचा अहेर दिला आहे.

जातीयवादाच्या राजकारणाला या देशाने कधीही स्वीकारले नाही. ६ सप्टेंबर १९९० या दिवशी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी संसदेत भाषण केले. ते एकदा सर्वांनी ऐकले पाहिजे. हा देश जर जातीयवादी असता, तर माजी पंतप्रधान विश्‍वनाथ प्रताप सिंह यांना घरोघरी पुजले गेले असते. त्यांनी मंडल आयोगाची कार्यवाही करून जातीचे राजकारण केले. त्यांच्यापेक्षा मोठा जातीयवादी दुसरा कुणी नाही; पण त्यांची अवस्था काय झाली?, हे संपूर्ण देशाने पाहिले. हा काँग्रेसचा पराभव नाही, हा डाव्या विचारसरणीचा पराभव आहे. मागच्या काही दिवसांपासून डाव्या विचारसरणीचे लोक काँग्रेसमध्ये (congress) शिरले आहेत. काँग्रेसच्या (Congress) अनेक निर्णयांवर या डाव्या नेत्यांनी प्रभाव टाकलेला आहे. हे काही नेते काँग्रेसला म. गांधी यांच्या मार्गावरून हटवून साम्यवादी मार्गावर नेत आहेत. काँग्रेस पक्ष म. गांधी यांच्या विचारांवर मार्गक्रमण करत येथपर्यंत पोचला आहे. म. गांधी यांच्या सभेचा प्रारंभ ‘रघुपति राघव राजाराम, पतित पावन सीताराम’ या ओळींनी व्हायची. आज त्या काँग्रेसला ‘सनातन धर्माच्या विरोधतील पक्ष’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. हे दुर्दैवी आहे. काँग्रेसने अशा साम्यवादी नेत्यांना वेळीच बाजूला केले नाही, तर काँग्रेसची अवस्था लवकरच एम्.आय.एम्. या पक्षासारखी होईल, असेही कृष्णम म्हणाले.

(हेही वाचा Assembly Election 2023 Result : चार राज्यांच्या निकालांमुळे लोकसभेच्या ८२ जागांवर भाजपाची मोहर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.