Mizoram Assembly Election 2023 : मिझोराम मध्ये मतमोजणीला सुरुवात

274
Mizoram Assembly Election 2023 : मिझोराम मध्ये मतमोजणीला सुरुवात
Mizoram Assembly Election 2023 : मिझोराम मध्ये मतमोजणीला सुरुवात

मिझोराममध्ये विधानसभेच्या 40 जागांसाठी 7 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं होतं. यानंतर सोमवारी (४ डिसेंबर) सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतदान प्रक्रियेत सुमारे 77.04% मतदान झाले होते.सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (MNF), राम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत आहे. भाजप येथे किंगमेकर बनण्याचा प्रयत्न करत आहे.(Mizoram Assembly Election 2023)

10 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसला 2018 च्या विधानसभा निवडणुकीत सरकार गमवावे लागले होते. पी. ललथनहवला चांफई दक्षिण आणि सेरछिप या दोन्ही जागांवरून निवडणूक हरले होते. मिझो नॅशनल फ्रंटने (MNF) थेट लढतीत काँग्रेसचा पराभव केला. झोरमथांगा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर एमएनएफला 26, काँग्रेसला 5, भाजपला 1 आणि अपक्षांना 8 जागा मिळाल्या होत्या. (Mizoram Assembly Election 2023)

(हेही वाचा : BJP : एकाच वेळी दोन मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारा भाजपचा तेलंगणातील कोण आहे ‘जायंट किलर’?)

विविध संस्थांच्या एक्झिट पोलनुसार, याठिकाणी झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. अर्थात, सध्या सत्तेत असणाऱ्या मिझो नॅशनल फ्रंटला (MNF) देखील पुन्हा एकदा सत्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्थात, नेमकं कोण कुणाला मात देणार हे आता निकालांनंतरच स्पष्ट होणार आहे. (Mizoram Assembly Election 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.