फिलिपिन्सला (Philippines Earthquake) पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला आहे. आज म्हणजेच सोमवार, ४ डिसेंबर रोजी पहाटे १:१९ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल इतकी होती. यापूर्वी, रविवार (३ डिसेंबर) याच भागात ६.६ तीव्रतेचा भूकंप झाला होता आणि शनिवारी ७.६ तीव्रतेचा भूकंप झाला होता. तीन दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे अधिकाऱ्यांनी त्सुनामीचा (Tsunami Warning) इशारा देखील दिला आहे.
शनिवारी झालेल्या भूकंपात (Philippines Earthquake) किमान दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारपर्यंत अधूनमधून भूकंपाचे जोरदार हादरे जाणवले. लोकांनी घराबाहेर पडून उघड्यावर गर्दी केली. सततच्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
An earthquake of magnitude 6.8 on the Richter Scale hit Mindanao, Philippines at around 01:19 am today: National Center for Seismology
— ANI (@ANI) December 3, 2023
(हेही वाचा – Mizoram Assembly Election 2023 : मिझोराम मध्ये मतमोजणीला सुरुवात)
अनेक नागरिकांचे स्थलांतर
शनिवारी झालेल्या भूकंपामुळे (Philippines Earthquake) अधिकाऱ्यांनी प्रशांत महासागरात त्सुनामीचा इशारा जारी केला, ज्यामुळे मिंडानाओच्या पूर्व किनाऱ्याजवळ राहणाऱ्या लोकांना स्थलांतर करावे लागले आहे. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोक आपला जीव वाचवण्यासाठी उंच ठिकाणे शोधत आहेत.
दोघांचा मृत्यू, दोघे जखमी
सुरीगाओ डेल सुर प्रांतातील बिस्लिग शहरात घराच्या आत भिंत कोसळून एका ३० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, असे आपत्ती अधिकारी पॅसिफिको पेड्रावर्डे यांनी सांगितले. दावो डेल नॉर्टे प्रांतातील टागुम शहरात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. बिस्लिगपासून सुमारे १०० किमी अंतरावर असलेल्या तांडग शहरात ढिगारा कोसळून दोन जण जखमी झाले आहेत. (Philippines Earthquake)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community