ऋजुता लुकतुके
वनप्लस १२ फोन चीनमध्ये ५ डिसेंबरला लाँच होत आहे. त्यामुळे भारतातही तो लगेचच बाजारात आणला जाईल अशी शक्यता आहे. आणि फोनचे आतापर्यंत बाहेर आलेले टिझर बघितले तर फोनच्या फिचर्सचा अंदाज येतो. आणि त्यामुळे फोनची किंमतही तशीच तगडी असेल असा अंदाज व्यक्त होत आहे.
फोनचे काही महत्त्वाचे फिचर्स बघूया,
वन प्लस १२ फोनचे कॅमेरे हे कंपनीचा प्रिमिअम फोन वनप्लस ओपनसारखे आहेत. ओपन हा कंपनीचा फोल्डेबल फोन आहे. आणि यातील कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा आणि ३एक्स ऑप्टिकल झूम असलेला तसंच ६ एक्स इन-सेन्सर कॅमेरा आहे. तसंच फोटोमध्ये नैसर्गिक प्रकाश जसाच्या तसा ग्रहण करण्याची क्षमता आहे. वनप्लस ओपन फोनची किंमत १,३९,००० रुपये इतकी आहे. त्यामुळे तसाच कॅमेरा असलेल्या वनप्लस१२ फोनची किंमत ही त्याच रेंजमध्ये असेल अशी अटकळ आहे.
Insert tweet –
वनप्लस १२ फोनमध्ये वायरलेस चार्जर
OnePlus 12 design is officially revealed iu
1: Is that… marble?
2: The alert slider has switched to the left side of the phone pic.twitter.com/nCdDqVZmWU— Marques Brownlee (@MKBHD) November 27, 2023
आतापर्यंत जे टिझर बाहेर आले आहेत त्यानुसार, वन प्लस १२ फोनसाठी वायरलेस चार्जर देण्यात आला आहे. हे तंत्रज्जान सध्या खूप महाग आहे. किंबहुना वन प्लस ओपन या फ्लॅगशिप फोनमध्ये किंमत स्पर्धात्मक ठेवण्यासाठीच वायरलेज चार्जर्सचं फिचर वगळण्यात आलं होतं. पण, आता वनप्लस १२ फोनमध्ये वायरलेस चार्जर असेल तर फोनची किंमतही तशीच असणार हे उघड आहे.
(हेही वाचा- Share Market : भाजपच्या विजयाचा परिणाम शेअर बाजारावर, जाणून घ्या कोणते शेअर्स आहेत तेजीत)
आधुनिक डिस्प्ले
वनप्लस १२ फोनचा डिस्प्ले अत्याधुनिक आहे. आणि पावसात किंवा पाण्यातही फोन वापरता येणं ही त्याची सगळ्यात जमेची बाजू आहे. त्यामुळे हा फोन गेम चेंजिंग ठरणार आहे. या तंत्रज्जानाला कंपनीने ‘रेनवॉटर टच’ असं म्हटलं आहे. याशिवाय वनप्लस १२ फोनचा डिस्प्ले हा ४,५०० नीट्स युनिट इतकी प्रखरता असलेला असेल. म्हणजेच हा बाजारातील सगळ्यात जास्त प्रखर डिस्प्ले असलेला फोन असणार आहे. आणि त्यामुळे या फोनची किंमतही वनप्लस ११ पेक्षा खूप जास्त असण्याचीच शक्यता आहे.
वन प्लस १२चा चिपसेट
वन प्लस ११ मध्ये स्नॅपड्रॅगन जनरेशन ८ चा चिपसेट ३ असणार आहे. क्वालकॉम कंपनीचा प्रोसेसर या फोनमध्ये आहे. २०२४ मध्ये बाजारात अपेक्षित असलेले बहुतेक फोन हे याच प्रोसेसरवर आधारित असणार आहेत. पण, यामुळे फोनची किंमतही वाढणार आहे.
वनप्लस ११ फोनची भारतातील किंमत ५४,००० रुपये इतकी होती. पण, आता वनप्लस १२ ची किंमत ही ६०,००० रुपयांच्या जवळपास असेल असा अंदाज आहे.
(हेही वाचा- https://www.youtube.com/watch?v=piFAyD8oABQ)
Join Our WhatsApp Community