ऋजुता लुकतुके
सचिन तेंडुलकरचे बालपणीचे क्रिकेट प्रशिक्षक दिवंगत रमाकांत आचरेकर सरांची (Sachin Remembers Achrekar Sir) रविवारी जयंती होती. त्यामुळे सचिन तेंडुलकरने त्यांच्या स्मरणार्थ एक भावपूर्ण संदेश आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिला आहे. क्रिकेटमध्ये पुढे जाऊन जे यश मिळवलं त्याचं श्रेय सचिनने कामगिरीचं अवमूल्यन करण्याच्या सरांच्या सवयीला दिलं आहे. या संदेशाबरोबरच सचिनने आपला बालपणीचा सरांबरोबरचा फोटोही पोस्ट केला आहे.
आचरेकर सर सचिनला बॅटिंगचं तंत्र सुधारायला मदत करतायत असा फोटो आहे. आणि सचिनचा सरांबरोबरच्या लोकप्रिय फोटोंपैकी हा एक फोटो आहे. तोच सचिनने पुन्हा एकदा शेअर केला आहे.
‘मी आता क्रिकेटपटू म्हणून लोकांसमोर उभा आहे. तो क्रिकेटपटू ज्याने घ़डवला, आणि आयुष्यभर माझ्याबरोबर राहतील असे धडे मला दिले, अशा सरांची आठवण आज त्यांच्या जयंतीच्या दिवशी नेहमीपेक्षा प्रकर्षाने होत आहे,’ असं सचिनने आपल्या संदेशात म्हटलं आहे.
To the man who made me the cricketer I became! The lessons he taught me have stayed with me throughout my life. Remembering you all the more on your birth anniversary. Thank you so much for everything you did for me Achrekar Sir. pic.twitter.com/ZvBein61lK
— Sachin Tendulkar (@sachin_rt) December 3, 2023
रमाकांत आचरेकर सर हे क्रिकेटमधले नावाजलेले कोच होते. २ जानेवारी २०२९ ला मुंबईत वयाच्या ८७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सचिन बरोबरच विनोद कांबळी, लालचंद रजपूत, प्रवीण आमरे असे कितीतरी खेळाडू त्यांनी भारतीय संघाला तसंच मुंबई क्रिकेटला दिले. महाराष्ट्र सरकारने त्यांचा द्रोणाचार्य पुरस्कार देऊन सन्मान केला होता. तर २०१० साली त्यांना देशपातळीवर पद्मश्री पुरस्कारही मिळाला होता.
सचिन तेंडुलकर हा सरांचा सर्वोत्तम शिष्य. कारण, मास्टरब्लास्टर म्हणून (Sachin Remembers Achrekar Sir) ओळखल्या जाणाऱ्या सचिनने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये २०० कसोटींत त्याच्या नावावर १५,९२१ धावा जमा आहेत त्या ५३ धावांच्या सरासरीने. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८,४२६ धावांच्या त्याच्या विक्रमाच्या जवळपासही कुणी नाही.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community