Ayushman Bharat Yojana : आजारपणातील खर्चाची चिंता सतावते ? जाणून घ्या काय आहे ‘आयुष्यमान भारत योजना’ ?

Pradhan Mantri Jan Arogya Yojana : जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत, यासाठी केंद्र शासनाने वर्ष 2018 मध्ये योजना आणली आहे. 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य' या योजनेतून लाभार्थ्याला 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. 

1711
Ayushman Bharat Yojana : आजारपणातील खर्चाची चिंता सतावते ? जाणून घ्या काय आहे 'आयुष्यमान भारत योजना' ?
Ayushman Bharat Yojana : आजारपणातील खर्चाची चिंता सतावते ? जाणून घ्या काय आहे 'आयुष्यमान भारत योजना' ?

आजच्या धकाधकीच्या जीवनात वैद्यकीय खर्च केव्हा उद्भवेल, हे सांगता येत नाही. आता सर्व प्रकारच्या रोग-व्याधींवर उपचार उपलब्ध असले, तरी त्याचा खर्च मोठा असतो. अशा वेळी स्वत:चा आणि कुटुंबियांचा आयुर्विमा (mediclaim policy) असावा, असे प्रत्येकाला वाटत असते.

(हेही वाचा – Sachin Remembers Achrekar Sir : रमाकांत आचरेकरांच्या वाढदिवशी सचिनने केलं सरांचं स्मरण )

ज्यांना परवडते ते खाजगी आस्थापनांकडून आयुर्विमा काढतात. जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, त्यांनी काय करावे ? जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत, यासाठी केंद्र शासनाने वर्ष 2018 मध्ये योजना आणली आहे. ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ (Ayushman Bharat Yojana) ही ती योजना आहे. या योजनेतून लाभार्थ्याला 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात.

सरकारकडून मिळते ‘गोल्डन कार्ड’

कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकते. या योजने अंतर्गत सरकार लोकांना ‘आयुष्मान भारत गोल्डन कार्ड’ (Ayushman Bharat Golden Card) प्रदान करते. या योजनेंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात. (health policys)

योजना कोणासाठी ?
  • आयुष्मान भारत योजनेसाठी (Ayushman Bharat Yojana) अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
  • SECC–2011 मध्ये म्हणजे सामाजिक आर्थिक आणि जातिगणनेनुसार नोंदणीकृत व्यक्ती यात अर्ज करू शकतात.

(हेही वाचा – IAF : तेलंगणात वायुदलाचं ट्रेनर विमान कोसळलं! प्रशिक्षकासह दोन वैमानिकांचा मृत्यू)

असा करा ऑनलाईन अर्ज

New Project 36

१. अर्ज करण्यासाठी mera.pmjay.gov.in किंवा https://ayushmanbharat.mp.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा.
२.  तुमचा मोबाईल क्रमांक आणि स्क्रिनवर दिलेला कॅप्चा कोड टाका.
३. तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी (OTP) येईल, तो स्क्रिनवर दिलेल्या रकान्यांमध्ये भरा.
४. आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल. तिथे तुम्ही ज्या राज्यातून अर्ज करत आहात, त्या राज्याचा पर्याय निवडा.५. तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहात कि नाही, ते तपासण्यासाठी मोबाईल क्रमांक (Mobile Number), नाव, रेशन कार्ड नंबर (Ration Card Number) किंवा RSBY URN नंबर टाका.६. जर तुमचे नाव तुम्हाला समोर ओपन असलेल्या पेजच्या उजव्या बाजूला दिसत असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात.७. तुम्ही Family Number टॅबवर क्लिक करून योजनेसंदर्भातील तपशील देखील तपासू शकता.

योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
  •  आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • नवीन नोंदणीसाठी, ‘नवीन नोंदणी’ किंवा ‘अर्ज करा’ या टॅबवर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला तुमचे नाव, लिंग, आधार क्रमांक, रेशन कार्ड इत्यादी माहिती टाकावी लागेल.
  • लक्षात ठेवा की, आपण भरलेली कोणतीही माहिती बरोबर असावी.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • संपूर्ण अर्ज एकदा तपासा आणि नंतर सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर अधिकारी तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करतील.
  • यानंतर तुम्हाला आयुष्मान भारत योजनेअंतर्गत हेल्थ कार्ड सहज मिळेल.

(हेही वाचा – PM Narendra Modi यांचा सिंधुदुर्ग दौरा; नौदल दिनाच्या कार्यक्रमात राहणार उपस्थित)

ही कागदपत्रे तयार ठेवा

– आधार कार्ड
– शिधापत्रिका
– उत्पन्नाचे प्रमाणपत्र
– जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
– मोबाईल नंबर
– पासपोर्ट आकाराचा फोटो

या सुविधा मिळतील

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देशातील सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते. यासोबतच रुग्णालयात दाखल केल्यानंतरही पुढील 15 दिवसांचा सर्व खर्च सरकार उचलते. या योजनेची विशेष बाब म्हणजे यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांचे वय आणि संख्या लक्षात घेऊन योजनेचा लाभ मिळतो. यामध्ये तुम्हाला एक रुपयाही रोख भरावा लागणार नाही. कारण आयुष्मान योजना ही पूर्णपणे कॅशलेस योजना आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.