Ind vs Aus T20 : बरोबर प्रश्नांना जेव्हा सूर्यकुमार यादव चुकीची उत्तरं देतो

टी-२० मालिकेच्या धकाधकीच्या दौऱ्यात भारतीय खेळाडूंचे काही मजेशीर व्हीडिओ बीसीसीआय वारंवार प्रसिद्ध करत असते. 

1345
Ind vs Aus T20 : बरोबर प्रश्नांना जेव्हा सूर्यकुमार यादव चुकीची उत्तरं देतो
Ind vs Aus T20 : बरोबर प्रश्नांना जेव्हा सूर्यकुमार यादव चुकीची उत्तरं देतो
  • ऋजुता लुकतुके

टी-२० मालिकेच्या धकाधकीच्या दौऱ्यात भारतीय खेळाडूंचे काही मजेशीर व्हिडिओ बीसीसीआय वारंवार प्रसिद्ध करत असते. (Ind vs Aus T20)

ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पाचवा टी-२० सामना १० धावांनी जिंकत भारतीय संघाने मालिकाही ४-१ ने जिंकली आहे आणि अशा रीतीने या दौऱ्याची सांगता भारतीय संघासाठी विजयाने झाली. ही मालिका खिशात घातल्यानंतरचा भारतीय संघाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. (Ind vs Aus T20)

बीसीसीआयने अलीकडे खेळाडूंबरोबर एक मजेशीर सेशन केलं. यात खेळाडूंना प्रश्न बरोबर विचारले जातील. पण, त्यांनी चुकीचीच उत्तरं द्यायची होती आणि जी चुकीची उत्तरं खेळाडू देतील त्यातून मोठी विनोद निर्मिती झाली आहे. (Ind vs Aus T20)

यापूर्वी ईशान किशनबरोबरचं असं एक सत्र गाजलं होतं. आता ताज्या सत्रात कर्णधार सूर्यकुमार यादवबरोबरच वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग आणि प्रसिध कृष्णन हे खेळाडू सहभागी झाले आहेत. (Ind vs Aus T20)

हा व्हिडिओ पाहा,

(हेही वाचा – IAF : तेलंगणात वायुदलाचं ट्रेनर विमान कोसळलं! प्रशिक्षकासह दोन वैमानिकांचा मृत्यू)

तुमचं नाव काय असा प्रश्न विचारताच वॉशिंग्टन सुंदर म्हणाला, ‘शरलॉक,’ तर प्रसिध कृष्णा म्हणाला, ‘अर्शदीप,’ तर सूर्यकुमार यादवचं उत्तर जास्त हसवणारं होतं. तो म्हणाला, ‘राजू रस्तोगी.’ राजू रस्तोगी हे थ्री इडियट्स या प्रसिद्ध बॉलिवूडपटातील एक पात्र होतं. (Ind vs Aus T20)

कर्णधार सूर्यकुमार यादवने या मालिकेतील भारतीय संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. फलंदाजांनी आपली भूमिका पठवलीच. शिवाय रवी बिश्नोई आणि अक्षर पटेलच्या फिरकीमुळेही विजय मिळवणं सोपं झाल्याचं तो म्हणाला. रवी बिश्नोई या मालिकेत १२ बळी घेत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. (Ind vs Aus T20)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.