Devendra Fadnavis : मोदी, शहा आणि नड्डा विजयाचे शिल्पकार

189
Maharashtra Assembly Poll : भाजपाच्या यादीवर देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा!

छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशात भाजप बहुमताच्या उंबरठ्यावर पोहचला असताना महाराष्ट्राचे (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा या विजयाचे शिल्पकार असल्याचे म्हंटले आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, मोदींनी देशाला विकासाच्या मार्गावर नेले, अमित शाह मास्टर स्ट्रेटेजिक ठरले आणि नड्डांनी पक्षांची योग्य बांधणी करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. त्याबळार भाजपला ३ राज्यात चांगले यश मिळाल्याचे विश्लेषण फडणवीस यांनी केले. यावेळी फडणवीसांना काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले.

(हेही वाचा – Share Market : भाजपच्या विजयाचा परिणाम शेअर बाजारावर, जाणून घ्या कोणते शेअर्स आहेत तेजीत)

वर्ल्डकप फायनल मॅचमध्ये पंतप्रधानांच्या (Devendra Fadnavis) उपस्थितीमुळे पनवती (अपशकुन) होऊन भारत हरल्याची टीका काँग्रेसने केली होती. त्यानंतर सोशल मिडीयामध्ये मोदींना पनवती म्हणून हिणवले जात होते. याचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले की, आता पनवती कोण आहे हे काँग्रेसला कळले असेल. निवडणूक निकालात ते दिसून आले आहे. त्यामुळे आता राहुल गांधी किंवा काँग्रेसचे लोक आता पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत असे शब्द वापरणार नाहीत याची मला खात्री असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला.

यावेळी त्यांनी सांगितले की, भाजपच्या (Devendra Fadnavis) मतांमध्ये १० टक्क्यांची वाढ झाली आहे. छत्तीसगडमध्ये १४ आणि मध्यप्रदेशात ८ टक्के मते वाढली आहेत. यावरून जनतेचा भाजपावर विश्वास असल्याचे दिसून येते. आत्ताचे कल पाहिले तर तीन राज्यांमधील ३६९ जागांपैकी ३३९ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. तर ५० टक्क्यांहून जास्त जागा भाजपाला मिळाल्या आहेत. हा निकाल जनतेच्या मनात काय आहे याची नांदी आहे. लोकसभेत जो अभूतपूर्व विजय भाजपाला मिळणार आणि एनडीएला मिळणार आहे त्याची सुरुवात आहे. विरोधकांच्या आयएनडीए आघाडीला लोकांनी नाकारल्याचे हे द्योतक असल्याचे फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

(हेही वाचा – PM Narendra Modi यांचा सिंधुदुर्ग दौरा; नौदल दिनाच्या कार्यक्रमात राहणार उपस्थित)

विरोधकांना टोला लगावताना फडणवीस म्हणाले की, या निवडणूक निकालानंतर आता आयएनडीए आघाडीची बैठक होईल आणि त्यात पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले जाईल अशी टीका देखील फडणवीसांनी (Devendra Fadnavis) याप्रसंगी केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.