हिमाचल येथील शिमला येथे मजदुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपचा मोठा सोमवारी (4 डिसेंबर) अपघात झाला. या अपघातात ६ मजदुरांचा मृत्यू झाला असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलीस अपघाताचा तपास करत आहेत. अपघाताची कारणे समजू शकलेली नाहीत.जखमींवर सुन्नी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Accident )
या अपघातात ठार झालेले लोक मजूर आहेत. राजधानी शिमल्यापासून ५० किमी अंतरावर मंडी जिल्ह्याच्या सीमेवर सुन्नी शहर आहे. सुन्नीतील कादरघाट येथे हा अपघात झाला आहे. येथे एका पिकअप वाहनाला अपघात झाला, यात एकूण ३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ३ जखमींचा सुन्नी रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. (Accident)
(हेही वाचा :Chennai Cyclone : ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे चैन्नई रन वे वर पाणीच पाणी, प्रवाशांचे हाल)
या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत. सर्व गंभीर जखमींना उपचारासाठी सुन्नी रुग्णालयात आणण्यात आले आहे.सुनी ते किंगल जोडणाऱ्या लिंक रोडवर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. पिकअपमध्ये चालकासह १२ जण कडाघाटातील बाजाराकडे जात होते. कादरघाटापासून काही अंतरावर पिकअप खोल दरीत पडली. या अपघाताची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली आणि गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी सर्व जखमींना सुन्नी हॉस्पिटलमध्ये नेले, सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community