पुण्यातील (Pune) बाणेर परिसरात खोदकाम करत असताना ग्रेनेड आढळून आले. मेट्रोचे काम सुरू असताना मेट्रो प्रशासनाला विविध प्रकारचे ग्रेनेड सापडले आहेत.
हे काम एका संस्थेच्या जमिनीत सुरू होते. या खोदकामात 2 हॅन्ड ग्रेनेड सापडल्याने खळबळ उडाली आहे. तर तातडीने पोलीस आणि बॉम्ब नाशक पथक घटनास्थळी रवाना झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ बॉम्बशोधक व नाशक पथकाला प्राचारण केले. बॉम्बशोधक व नाशक पथकाने हा हॅन्ड ग्रेनेड ताब्यात घेतला. तो जागेवरच निकामी करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हॅन्ड ग्रेनेड ब्रिटिशकालीन असून या ठिकाणी मेट्रोचे पत्रे लावण्याचे काम सुरू होते. त्याकरिता सुरू असलेल्या खुदाई दरम्यान हा हॅन्ड ग्रेनेड मिळून आला. तूर्तास घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
(हेही वाचा Assembly Election 2023 Result : चार राज्यांच्या निकालांमुळे लोकसभेच्या ८२ जागांवर भाजपाची मोहर)
Join Our WhatsApp Community