Zoram People’s Movement मिझोराममधील 6 पक्षांच्या युतीतून बनलेला पक्ष; नवीन नाव, जुना चेहरा

306
Zoram People's Movement मिझोराममधील 6 पक्षांच्या युतीतून बनलेला पक्ष; नवीन नाव, जुना चेहरा
Zoram People's Movement मिझोराममधील 6 पक्षांच्या युतीतून बनलेला पक्ष; नवीन नाव, जुना चेहरा

मिझोरामचा नव्याने स्थापन झालेला पक्ष झेडपीएमने (झोराम पिपल्स मूव्हमेंट) मिझोराममध्ये मुसंडी मारली आहे. झेडपीएमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेले लालदुहोमा (Lalduhoma) यांनी स्वत: गेल्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. झोराम पिपल्स मूव्हमेंट (Zoram People’s Movement) हा पक्षच सहा पक्षांच्या आघाडीतून तयार झाला आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण)

ईशान्येकडील राजकारणात पारंगत असलेले ज्येष्ठ पत्रकार जोसेफ लेप्चा यांनी म्हटले आहे की, पाच वर्षांपूर्वी निवडणूक आयोगाने या पक्षाला मान्यता दिली. झेडपीएम (ZPM) हे नवीन नाव असल्यासारखे वाटू शकते, परंतु त्याचे नेतृत्व मिझोरमच्या लोकांसाठी नवीन नाही. लालदुहोमा हे मिझोरामच्या (Mizoram) राजकारणातील जुने नाव आहे. इंदिरा गांधींच्या (Indira Gandhi) काळापासून ते राजकारणात सक्रिय आहेत आणि काँग्रेसपासून ते झोरमथांगापर्यंत राज्यात सक्रिय असलेल्या प्रत्येक पक्षाची ताकद आणि कमकुवतपणा त्यांना माहीत आहे. लालदुहोमा यांनी तळागाळात काम केले आहे. स्वतःला एक मजबूत पर्याय म्हणून सादर करत, झोरामथांगा सरकारच्या विरोधात सतत आवाज उठवून एक वातावरण निर्माण केले.

कसा आहे ZPM चा प्रवास
  • 1977च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेचे (आय. पी. एस.) अधिकारी लालदुहोमा (Lalduhoma) हे इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांचे सुरक्षा प्रभारी होते.
  • मिझोराममध्ये बंडखोरी संपवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी लालदुहोमा यांच्या भूमिकेवरही चर्चा केली जाते. लालदुहोमा यांनी भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिल्यानंतर राजकारणात प्रवेश केला आणि 1984 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले.
  • लालदुहोमा यांनी 1988 मध्ये काँग्रेस सोडली आणि पक्षांतर कायद्यांतर्गत संसदेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरणारे ते पहिले सदस्य ठरले.
  • लालदुहोमा यांनी झोराम नॅशनॅलिस्ट पार्टी (Zoram Nationalist Party) नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि त्याच्या झेंड्याखाली राजकारणात सक्रिय राहिले. त्यांनी इतर पाच लहान पक्षांसह झेडपीएम नावाची युती केली, जी नंतर राजकीय पक्ष बनली.
  • गेल्या निवडणुकीत लालदुहोमा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री लाल थनहवला (Lal Thanhawla) यांचा पराभव केला होता. निवडणूक आयोगाने झेडपीएमला (ZPM) मान्यता न दिल्याने लालदुहोमा यांनी तेव्हा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.

(हेही वाचा – Ishwar Sahu : कोण आहेत ईश्वर साहू; ज्यांनी यापूर्वी 7 वेळा आमदार राहिलेले रवींद्र चौबे यांचा पराभव केला…)

  • ५ वर्षांपूर्वी झेडपीएमला मान्यता मिळाली आणि लालदुहोमा पक्षाचे अध्यक्ष झाले. या आधारावर त्यांना विधानसभेच्या सदस्यत्वावरून अपात्र ठरवण्यात आले आणि मिझोराम विधानसभेचे सदस्यत्व गमावणारे पहिले आमदार म्हणूनही त्यांचे नाव नोंदवण्यात आले.
  • लालदुहोमा (Lalduhoma) त्यांचा पक्ष हा एक मोठा बनवण्यात यशस्वी झाला. याचे एक कारण म्हणजे ईशान्येकडील लोकांची राजकीय मनोवृत्ती. येथील लोकांना दिल्ली सरकारसोबत रहायला आवडते; पण दिल्ली नियंत्रित सरकारसोबत नाही. ईशान्येकडील लोक भाजप आणि काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांपेक्षा प्रादेशिक पक्षांना प्राधान्य देतात.  (Zoram People’s Movement )

झेडपीएमची विचारधारा भ्रष्टाचारविरोधी, अंमली पदार्थ तस्करीविरोधी आहे. मिझोरमचे लोक लालदुहोमाच्या धोरणांवर विश्वास ठेवतात, असे दिसते. (Assembly Election 2023 Result)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.