पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तारकर्ली या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा असेल आणि नौदलाच्या पदांना भारतीय पद्धतीची नावे देणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
समुद्री सामर्थ्य किती महत्वाचे आहे, हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ओळखले होते. त्यामुळे त्यांनी शक्तिशाली नौसेना बनवली. छत्रपती शिवाजी यांचे सगळे मावळे आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी भारतीय नौदलाच्या सदस्यांना नौदल दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. भारताने आज गुलामीची मानसिकता मागे टाकली आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. नौसेनेच्या ध्वजाला मागच्या वर्षी महाराजांच्या विचारांशी जोडता आले, हे माझे भाग्य आहे, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
(हेही वाचा River Pollution : महाराष्ट्रातील सर्वाधिक नद्या आहेत प्रदूषित; मिठीसह कोणत्या नद्या बनल्यात धोकादायक?)
समुद्री सामर्थ्य किती महत्वाचे आहे, हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ओळखले होते. त्यामुळे त्यांनी शक्तिशाली नौसेना बनवली. छत्रपती शिवाजी यांचे सगळे मावळे आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. भारताने आज गुलामीची मानसिकता मागे टाकली आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. नौसेनेच्या ध्वजाला मागच्या वर्षी महाराजांच्या विचारांशी जोडता आले, हे माझे भाग्य आहे. आता नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा असेल आणि नौदलाच्या पदांना भारतीय पद्धतीची नावे देणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी यावेळी केली
Join Our WhatsApp Community