Tourism News : राष्ट्रीय सर्वोत्तम पर्यटन ग्राम आणि ग्रामीण घरगुती निवास सुविधा स्पर्धा २०२४, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

यापूर्वीच्या राष्ट्रीय सर्वोत्तम पर्यटन ग्राम स्पर्धा २०२३ मध्ये भारतामधील ३५ गावांची सुवर्ण, रौप्य आणि कांस्य श्रेणीत निवड करण्यात आली होती.

274
TLok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीमुळे पर्यटनाला धक्का, मे महिन्याच्या सुट्टीतील सहलीचे बेत रद्द
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीमुळे पर्यटनाला धक्का, मे महिन्याच्या सुट्टीतील सहलीचे बेत रद्द

देशात ग्रामीण पर्यटनाला (Rural tourism) देण्यात येणारे प्रोत्साहन आणि विकासाला अधिक चालना देण्यासाठी राष्ट्रीय सर्वोत्तम पर्यटन ग्राम आणि राष्ट्रीय सर्वोत्तम ग्रामीण घरगुती निवास सुविधा स्पर्धा २०१४ केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने सुरू केल्या आहेत. यापूर्वीच्या राष्ट्रीय सर्वोत्तम पर्यटन ग्राम स्पर्धा २०२३ मध्ये भारतामधील ३५ गावांची सुवर्ण, रौप्य आणि कांस्य श्रेणीत निवड करण्यात आली होती. (Tourism News)

देशात ग्रामीण पर्यटनाला (Rural tourism) चालना देण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने पर्यटकांसाठी ग्रामीण घरगुती निवाससुविधांची लोकप्रियता वाढवण्यासाठी राष्ट्रीय नीतिसह ग्रामीण घरगुती निवाससुविधाविषयक सर्वसमावेशक राष्ट्रीय धोरण आणि आराखडा तयार केला होता. ग्रामीण पर्यटन (Rural tourism) आणि ग्रामीण घरगुती निवाससुविधांना लोकप्रिय करण्यासाठी राष्ट्रीय सर्वोत्तम पर्यटन ग्राम आणि राष्ट्रीय सर्वोत्तम ग्रामीण घरगुती निवास सुविधा स्पर्धांचे आयोजन करणे हा भारतीय पर्यटन (Indian Tourism) आणि प्रवास व्यवस्थापन संस्थेच्या सहकार्याने मंत्रालयाचा धोरणात्मक उपक्रमांपैकी एक उपक्रम आहे. (Tourism News)

(हेही वाचा – Water Pipeline : जलवाहिनीला हानी पोहोचवणाऱ्या मेट्रोच्या ‘त्या’ कंत्राटदाराला महापालिकेची नोटीस)

ग्रामीण पर्यटनवाढीसाठी (Rural tourism) सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आणि पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने राज्य सरकारे, उद्योगातील हितधारक, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक समुदायांना या स्पर्धांच्या माध्यमातून सक्रीय केले आहे. या स्पर्धेमुळे परिचित नसलेले भाग पर्यटकांसाठी अधिक खुले होतील, ज्यामुळे समुदायांच्या सहभागात वाढ होईल, सांस्कृतिक वारशाचे जतन होईल आणि शाश्वत पर्यटनाला चालना मिळू शकेल. (Tourism News)

पर्यटन मंत्रालयाने ग्रामीण पर्यटनासाठी (Rural tourism) या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने केंद्रीय ग्रामीण पर्यटन आणि ग्रामीण घरगुती निवाससुविधा नोडल संस्था (CNA RT & RH) स्थापन केली आहे. ग्रामीण स्तरावर या स्पर्धांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी मास्टर ट्रेनर्स (Master Trainers) तयार करण्यासाठी ही संस्था क्षमता उभारणी सत्रांचे आयोजन करत आहे. ही स्पर्धा जागतिक पर्यटन दिनी (World Tourism Day) म्हणजे २७ सप्टेंबर २०२३ रोजी सुरू करण्यात आली होती आणि त्यासाठी १५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज पाठवता येणार आहेत. www.rural.tourism.gov.in या लिंकच्या माध्यमातून अर्ज करण्याच्या पोर्टलचा वापर करता येईल. (Tourism News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.