माती ही आपल्या (Soil Conservation) सर्वांसाठी महत्त्वाची आहे. कारण, मातीमध्ये अनेक पोषक (World Soil Day) तत्त्वांचा समावेश असतो. खनिजे, सेंद्रिय पदार्थ आणि हवा यांचा समावेश असतो. वनस्पतींच्या वाढीसाठी माती महत्त्वाची आहे, तसेच विविध प्रकारचे किटक आणि इतरही अनेक जिवांना आधार देणारा माती ही त्यांची ‘माय’च आहे. त्यामुळे तिचे संरक्षण करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे.
मागील काही वर्षांमध्ये जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे. मातीचे नुकसान देखील होत आहे. मातीच्या नुकसानाबाबत जनजागृती करण्यासाठी जगभरात दरवर्षी ५ डिसेंबरला जागतिक मृदा दिन साजरा केला जातो. आज जागतिक मृदा दिन आहे, त्या निमित्ताने आपण ‘माती वाचवा आंदोलना’बद्दल आणि मातीचा बचाव करणाऱ्या मार्गांबद्दल जाणून घेऊया –
‘माती वाचवा’ आंदोलनाचे महत्त्व
मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे १९७७ साली देशातील पहिले ‘माती वाचवा’ आंदोलन करण्यात आले. येथील तवा धरणामुळे शेतीयोग्य मातीचे रुपांतर दलदलीमध्ये होत होते. त्यामुळे शेतीतून उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. या कारणांमुळे तेथील शेतकऱ्यांनी ‘माती वाचवा’ हे आंदोलन सुरू केले होते. मागील वर्षी हे आंदोलन पुन्हा चर्चेत आले होते. त्यानंतर, मागील वर्षीच्या पर्यावरण दिनानिमित्त दिल्लीत ‘माती वाचवा चळवळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृदा संवर्धन या विषयावर अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या.
मृदा संवर्धनाचे पर्याय…
– प्लॅस्टिकचा वापर टाळणे.
-जंगलतोडीवर बंधने घालणे.
– वृक्ष लागवडीवर भर देणे.
– उतारावर असलेल्या जमिनीवर बंधारे बांधून जमिनीची धूप थांबवणे.
– शेतीची नांगरणी करताना ती उताराच्या विरुद्ध दिशेने करणे
हे मातीचा बचाव अर्थात मृदा संवर्धनाचे विविध मार्ग आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community