ऋजुता लुकतुके
मर्सिडिज बेंझ (Mercedes Benz EQA) कंपनीने इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये पाऊल ठेवल्यानंतर ईक्यू श्रेणीतल्या गाड्या बाजारात आणायला सुरुवात केली आहे. आता ख्रिस्मस आणि न्यू ईयरच्या मूहूर्तावर कंपनीने आपली सगळ्यात छोटी आणि एंट्री लेव्हलची एसयुव्ही गाडी मर्सिडिज- बेंझ ईक्यूए बाजारात आणली आहे. आणि या गाडीसाठी बुकिंग सुरूही झालं आहे.
२०२१ मध्ये कंपनीने या गाडीचं उत्पादन त्यांच्या जर्मनी आणि चीनमध्ये बीजिंग इथल्या कारखान्यात सुरू केलं. त्यानंतर लगेचच त्यांनी बनलेली पहिली कार लोकांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून उघड केली होती. ही फॅमिली एसयुव्ही कार असून त्यात बसलेल्या लोकांना पूर्णपणे इलेक्ट्रिक म्हणजेच डिजिटल अनुभव मिळेल, असं कंपनीने या कारबद्दल म्हटलं आहे.
The upgraded EQA and EQB provide digital benefits and customisation options through the Mercedes me Store. Many digital extras, such as advanced charging solutions, are included with the purchase for up to 36 months.
More: https://t.co/HUc10U4d8a #MercedesBenz #EQA #EQB pic.twitter.com/9riehEEg7S
— Mercedes-Benz (@MercedesBenz) November 7, 2023
रस्त्यावर धावणारा इलेक्ट्रिक ॲथलीट असं कंपनीने या कारचं वर्णन केलं आहे. या गाडीत अपघात टाळण्यासाठी इलेक्ट्रिक इंटलिजन्स असेल. तसंच गाडीला रस्ता दाखवणारी अत्याधुनिक यंत्रणाही असेल, असं कंपनीने म्हटलंय. मर्सिडिजच्या इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये हेडलँपना जोडणारी एक दिव्यांची सलग माळ असते. म्हणजे हेडलँप व्यतिरिक्त अगदी सकाळच्या प्रकाशातही ही दिव्यांची अख्खी माल तुम्ही सुरू ठेवू शकता. गाडीच्या पाठी आणि पुढे अशी दिव्यांची माळ असेल. तर हेडलँपमध्ये इतर मर्सिडिज गाड्यांना असतो तसा निळा दिवाही असेल.
ही गाडी पूर्णपणे इलेक्ट्रिक अनुभव देणारी असल्यामुळे गाडीचं इंटिरिअर बनवतानाही कंपनीने वेगळा विचार केला आहे. व्हेंटिलेशन आऊटलेट्स, डिस्प्ले अशा इतर साधनांनाही बॅकलिट असलेली निळी हलकी रेषा देण्यात आली आहे.
या गाडीची बॅटरीही तगड्या क्षमतेची असून एकदा चार्ज केली की ती ४२५ किमीपर्यंत जाऊ शकते. तर गाडीत सिंगल इलेक्ट्रिक मोटार आहे जी १९० पीएस इतकी ऊर्जा निर्माण करू शकते. तर गाडीची बॅटरी ३० मिनिटांत ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते.
मर्सिडिजची ही एन्ट्री लेव्हर एसयुव्ही असली तरी तिची किंमत ६० लाख रुपयांपासून सुरू होत आहे. आणि टेस्ला वाय आणि वोल्वो सी४० या गाड्यांबरोबर ईक्यूएची स्पर्धा असेल.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community