Ind vs Aus 5th T20 : ‘या’ ऑस्ट्रेलियन समालोचकाने पंचांवर नाराजी व्यक्त करताना नेमकं काय म्हटलं? 

बंगळूरूच्या शेवटच्या टी-२० सामन्यात पंचांचे दोन निर्णय ऑस्ट्रेलिया विरुद्ध गेले. आणि समालोचन करताना माजी कसोटीपटू मॅथ्यू हेडनने शेलक्या शब्दात पंचांना सुनावलं…

302
Ind vs Aus 5th T20 : ‘या’ ऑस्ट्रेलियन समालोचकाने पंचांवर नाराजी व्यक्त करताना नेमकं काय म्हटलं? 
Ind vs Aus 5th T20 : ‘या’ ऑस्ट्रेलियन समालोचकाने पंचांवर नाराजी व्यक्त करताना नेमकं काय म्हटलं? 

ऋजुता लुकतुके

समालोचन कक्षात खरंतर तु्म्ही नि:पक्षपणे सामन्याचं धावतं वर्णन करत असता. पण, तुम्ही एकेकाळी खेळाडूही राहिलेले असता. आणि मग पंचांचा एखादा निर्णय तुमच्या संघाविरोधात गेला की, तुमच्या भावना अनावर होऊ शकतात. ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू मॅथ्यू हेडनचं काहीसं असंच झालं.

बंगळुरू टी-२० सामन्यांत शेवटच्या षटकांत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी (Ind vs Aus 5th T20) दहा धावांची गरज होती. अर्शदीपने पहिलाच चेंडू बाऊंसर टाकला. तो मॅथ्यू वेडच्या डोक्यावरून गेला. त्यामुळे तो वाईड द्यावा अशी त्याची अपेक्षा होती. रिप्लेमध्येही चेंडू हेल्मेटवरून गेल्याचंच दिसलं.

वेड तर वैतागलाच. शिवाय समालोचन करणारा मॅथ्यू हेडन पटकन म्हणाला, ‘वेड नाराज का झाला ते तुम्ही समजू शकता. तो उभा होता. तरीही चेंडू त्याच्या डोक्यावरून गेला. तो वाईड असायला हवा होता,’ मॅथ्यू वेड म्हणाला. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नॅथन एलिसने फटकावलेला चेंडू अर्शदीपच्या हाताला लागून पंचांच्या उजव्या पायाला लागला. त्यामुळे चेंडू अडवला गेला.

(हेही वाचा-CM Eknath Shinde : नौदलाच्या ध्वजामध्ये राजमुद्रेचा वापर महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद)

इथं मात्र हेडनच वैतागला आणि तो असं बोलला जसं की, भारतीय संघ आणि पंचांचं यात काही साटंलोटंच असावं.

‘पंचांनी एकाच षटकात दुसऱ्यांदा असं केलंय. यावेळी स्केअरलेगचा नाही तर गोलंदाजांजवळचा पंच होता. पण, सगळ्यांचीच मिलीभगत दिसत आहे,’ असं हेडन बोलून गेला. वास्तविक यावेळी मैदानावर (Ind vs Aus 5th T20) जे घडलं ते खेळाच्या ओघात घडलेलं होतं. अर्थात, हेडन संघाच्या पराभवाने दुखावला होता. आणि त्याला ते दु:ख लपवता आलं नाही.

दुसरीकडे अर्शदीपने या षटकाबद्दल बोलताना आपली रणनीती सांगितली. त्याने आधीच्या तीन षटकांत ३१ धावा दिल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर दडपण होतं. ‘मला पहिला बाऊंसरच टाकायचा होता. त्याने वेडच्या मनात शंका निर्माण झाल्या असत्या. ती चाल बरोबर ठरली. पुढच्या चेंडूवर तो बाद झाला तेव्हा विजय दृष्टीपथात दिसायला लागला,’ असं सामन्यानंतर बोलताना अर्शदीप म्हणाला.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.