Thane-Belapur Route: ठाणे-बेलापूर मार्गावर अवजड वाहनांना बंदी; कोणते आहेत पर्यायी मार्ग? जाणून घ्या…

या मार्गावर जड-अवजड वाहनांना पूर्णतः बंदी घालण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.

203
Thane-Belapur Route: ठाणे-बेलापूर मार्गावर अवजड वाहनांना बंदी; कोणते आहेत पर्यायी मार्ग? जाणून घ्या...
Thane-Belapur Route: ठाणे-बेलापूर मार्गावर अवजड वाहनांना बंदी; कोणते आहेत पर्यायी मार्ग? जाणून घ्या...

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअर्स येथे उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावरील जड-अवजड वाहनांना पूर्णत: बंदी घातली आहे तसेच या मार्गावरून जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना पर्यायी मार्गाची व्यवस्थादेखील केली आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअर या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू करण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाच्या कामात कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी या मार्गावर जड-अवजड वाहनांना पूर्णतः बंदी घालण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाने याबाबतची अधिसूचना काढली असून बुधवारी (ता. ६) ही अधिसूचना लागू होणार आहे.

(हेही वाचा – Ind vs Aus 5th T20 : ‘या’ ऑस्ट्रेलियन समालोचकाने पंचांवर नाराजी व्यक्त करताना नेमकं काय म्हटलं? )

पर्यायी मार्ग 

– ठाण्याहून बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना अग्निशमन जंक्शनपासून डावीकडे वळण घेऊन मारुती सुझुकी शोरूम येथून एमआयडीसीमार्गे इच्छित स्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
– ठाणे-बेलापूर मार्गावरील अग्निशमन जंक्शन आणि पावणे गाव एमआयडीसीपासून पुढे आलेल्या जड-अवजड वाहनांना सविता केमिकल पुलाखालून डावीकडे वळण घेऊन शालीमार चौक एमआयडीसीमार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे.

– तुर्भे नाक्याकडून इंदिरानगर सर्कल येथून अमाईन्स कंपनीकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद करण्यात येत असून तुर्भे नाक्याकडून इंदिरा नगर सर्कल येथून अमाइन्सकडे जाणाऱ्या वाहनांना इंदिरानगर सर्कल येथून डावीकडे वळण घेऊन इच्छित स्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

– पुणे-मुंबई महामार्गावरून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना उरण फाटा ब्रीजखालून उजवे वळण घेण्यास, तसेच अपोलो हॉस्पिटल, जेएनपीटीमार्गे येणाऱ्या सर्व वाहनांना उरण फाटा ब्रीजखालून एमआयडीसीमार्गे जाण्यास प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना उरण फाटा ब्रीजखालून एलपी ब्रीज-शरयू मोटर्स-तुर्भे ओव्हर ब्रीज व सविता केमिकल ब्रीजखालून उजवीकडे वळण घेऊन इच्छितस्थळी जाता येणार आहे.

– महापे अंडरपासमधून ठाण्याकडून येणाऱ्या वाहनांना महापे शिळफाटा, कळंबोलीमार्गे जेएनपीटीकडे तसेच पुणे आणि गोव्याच्या दिशेने जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.