Nagpur Drought : नागपूरच्या ११ महसुली मंडळांत दुष्काळ जाहीर

218
Nagpur Drought : नागपूरच्या ११ महसुली मंडळांत दुष्काळ जाहीर

जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या १५ टक्के पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मि.मि. पेक्षा कमी झालेले आहे, अशा नागपूर जिल्ह्यातील ११ महसुली मंडळांमध्ये (Nagpur Drought) दुष्काळ घोषीत करण्यात आला आहे.

शासन निर्णयानुसार सावनेर तालुक्यातील सावनेर, पाटणसावंगी, केळवद व खापा, मौदा तालुक्यातील निमखेडा व खात, उमरेड तालुक्यातील सिर्सी, नरखेड तालुक्यातील मेंढला, रामटेक तालुक्यातील देवलापार, काटोल तालुक्यातील येनवा, कळमेश्वर तालुक्यातील मोहपा या महसुली मंडळात दुष्काळ घोषीत करून उपाययोजना व सवलतींची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. (Nagpur Drought)

(हेही वाचा – India’s Tour of South Africa : भारताविरुद्धच्या टी-२० व एकदिवसीय  मालिकेसाठी टेंबा बवुमाला विश्रांती, मार्करम करणार नेतृत्व )

जमीन, महसुलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या (Nagpur Drought) वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सुट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेत-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे अशा उपायययोजना व सवलतींचा समावेश आहे.

विविध सवलतींपोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून घ्यावा. यानुषंगाने संबंधित विभागांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व क्षेत्रिय यंत्रणांकरिता आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत. त्यानुसार याप्रकरणी उचित कार्यवाही करीत अनुपालन अहवाल सादर करावा. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ज्या मंडळातील पर्जन्यमापक यंत्रे बंद होती अथवा नवीन महसुली मंडळे स्थापन केल्यामुळे त्या महसुली मंडळामध्ये पर्जन्यमापक यंत्रे अद्याप बसविली गेली नसतील अशा मंडळांची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. (Nagpur Drought)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.