Sam Curran Wears Sunglasses : फलंदाजी करताना चश्मा लावल्यामुळे इंग्लिश फलंदाज सॅम करन सोशल मीडियावर होतोय ट्रोल 

वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत फलंदाजी करताना सॅम करनने चश्मा लावल्यामुळे तो सोशल मीडियावर चेष्टेचा विषय ठरला आहे

290
Sam Curran Wears Sunglasses : फलंदाजी करताना चश्मा लावल्यामुळे इंग्लिश फलंदाज सॅम करन सोशल मीडियावर होतोय ट्रोल 
Sam Curran Wears Sunglasses : फलंदाजी करताना चश्मा लावल्यामुळे इंग्लिश फलंदाज सॅम करन सोशल मीडियावर होतोय ट्रोल 

ऋजुता लुकतुके

वेस्ट इंडिजने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यांत (Sam Curran Wears Sunglasses) विजयी सुरुवात केली आहे. इंग्लंडच्या ३२५ धावांच्या आव्हानाला तोंड देताना शाय होपने शतक झळकावत विंडिज संघाला विजय मिळवून दिला. मालिकेतही संघाने आता आघाडी घेतली आहे. अलीकडेच भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी विंडिज संघ पात्रही ठरला नव्हता. आणि आता वर्ल्ड टी-२० स्पर्धेची तयारी करताना संघाला आत्मविश्वास देणारा हा विजय होता.

हॅरी ब्रूक आणि सॅम करन यांनी सहाव्या गड्यासाठी केलेल्या ६६ धावांच्या जलद भागिदारीमुळे इंग्लिश संघ तीनशेचा टप्पा ओलांडू शकला होता. ब्रूकने ७१ तर करनने २६ चेंडूत ३८ धावा केल्या. पण, या भागिदारीत फलंदाजी करताना करन चक्क चश्मा लावून मैदानात आला होता.

त्याच्या मजेशीर प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत. सगळ्यात आधी फॅनकोड पोर्टलने ‘करनमुळे नव्वदीच्या दशकाच्या आठवणी ताज्या झाल्या,’ असं म्हटलं. तर या ट्विटला उत्तर देताना आणखी मजेशीर प्रतिक्रिया आल्या आहेत. एका प्रेक्षकाने काहीशी टर उडवताना, ‘चश्मा लावून फलंदाजी केली आणि गोलंदाजीत १०० धावाही दिल्या,’ असं म्हटलं आहे.

इंग्लंडच्या ३२५ धावांना उत्तर देताना वेस्ट इंडिजची सुरुवातच चांगली झाली. आणि ब्रेंडन किंग तसंच एलिक ॲथनेज यांनी १०४ धावांची सलामी संघाला करून दिली. आणि त्यानंतर कर्णधार शाय होपचं वादल सर रिचर्ड्स मैदानावर आलं. आणि त्याने ७ षटकारांची आतषबाजी करत टी-२० स्टाईलने १०९ धावा केल्या. आणि वेस्ट इंडिजचा विजय निश्चित केला.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.