I.N.D.I. Alliance : इंडी आघाडीच्या नेत्यांनी काँग्रेसला धरले धारेवर, बैठकीत ‘हे’ नेते सहभागी होणार नाही

भारतीय जनता पक्षाला हरवून देशात सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र आलेल्या विरोधकांमध्ये तीव्र मतभेद झालेले दिसून येत आहे.

293
झारखंडमधील जागावाटपावरुन I.N.D.I. Alliance मध्ये फूट; राजद स्वतंत्रपणे लढण्याच्या पवित्र्यात

भारतीय जनता पक्षाला (BJP) हरवून देशात सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र आलेल्या विरोधकांमध्ये तीव्र मतभेद झालेले दिसून येत आहे. शिवाय चार राज्यांच्या निकालाचा जबरदस्त प्रभाव झाला असून उद्या म्हणजेच बुधवारी ६ डिसेंबरला दिल्ली मध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या बैठकीला ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), अखिलेश सिंग यादव (Akhilesh Yadav) आणि मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) उपस्थित राहणार नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महत्वाचे म्हणजे सर्वांना खर्गे यांनी व्यक्तिगतरित्या फोन केले होते. चार राज्यात हार पत्कराव्या लागणाऱ्या काँग्रेस (Congress) पक्षाला सर्वच विरोधकांनी एकत्र येऊन चांगलेच खडसावलं असल्याचेही कळतंय. (I.N.D.I. Alliance)

तसेच इंडी आघाडीची (I.N.D.I. Alliance) बैठक बुधवारी ६ डिसेंबरला होणार आहे. याबाबत ममता बॅनर्जी म्हणाल्या की. मला याबाबत कोणतीही माहिती मिळाली नसल्याने उत्तर बंगालमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामुळे मी इंडी आघाडीच्या बैठकीला जाऊ शकणार नाही. कोलकाता येथे एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी सांगितले की, जर मला आघाडीच्या बैठकीची माहिती असती तर मी हा कार्यक्रम आयोजित केला नसता. (I.N.D.I. Alliance)

दरम्यान तृणमूल काँग्रेसने आपल्या मुखपत्र ‘तृणमूल काँग्रेसने आपल्या मुखपत्र ‘जागो बांगला’मध्ये इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स (I.N.D.I.A.) मधील सहयोगी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. चार राज्यांतील काँग्रेसच्या दारुण पराभवाबाबत मुखपत्राच्या संपादकीयात असे लिहिले आहे की, काँग्रेस (Congress) जमीनदारी मानसिकतेने भाजपशी लढत होती, त्यामुळे त्यांचा पराभव झाला. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि मिझोराममधील पराभवाच्या कारणांचा काँग्रेसने विचार करावा, असे तृणमूलने आपल्या मुखपत्रात लिहिले आहे. ज्या उणिवा दिसत आहेत त्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दुरुस्त कराव्या लागतील. (I.N.D.I. Alliance)

(हेही वाचा – Jofra Archer to Miss IPL? इंग्लिश क्रिकेट बोर्डाचा जोफ्रा आर्चरला आयपीएल न खेळता वर्ल्ड टी-२० वर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला )

काँग्रेसला एकट्याने निवडणूक लढवायची होती आणि त्यांचा पराभव झाला. पण अजूनही वेळ आहे, त्यांनी आपल्या उणिवा दूर करून लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) इंडी आघाडी मजबूत करावी. तसे न झाल्यास युतीचे नुकसान होईल. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवावर संताप व्यक्त केला. हा भाजपचा (BJP) विजय नसून काँग्रेसचा पराभव असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस जमीनदार मानसिकतेने निवडणूक लढत होती. इंडी पुढे नेण्यासाठी ममता दीदींनी काँग्रेसला काही सल्ला दिला होता, जो त्यांनी मान्य केला नाही. (I.N.D.I. Alliance)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.