Increase in Crime : बालके आणि महिलांसंदर्भातील गुन्ह्यात वाढ

एनसीआरबीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे

294
Increase in Crime : बालके आणि महिलांसंदर्भातील गुन्ह्यात वाढ

देशातील एकूण गुन्हागारीत घट झाली असली तर बालके आणि स्त्रियांच्या (Increase in Crime) संदर्भातील गुन्ह्यात वाढ झाली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो-2022 (एनसीआरबी) अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

आत्महत्येच्या प्रमाणात वाढ

एनसीआरबीच्या (Increase in Crime) अहवालानुसार देशात २०२२ मध्ये एकूण ५८,२४,९५६ गुन्हे दाखल झाले. यापूर्वी २०२१ मध्ये ६०,९६,३१० गुन्हे दाखल झाले होते. देशात २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये गुन्ह्यात ४.५ टक्के घट झाली आहे. परंतु, आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. धक्कादायक म्हणजे कोरोनानंतर अचानक होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ११.६ टक्क्यांनी वाढले. देशात आत्महत्येचे प्रमाण ४.२ टक्के वाढले. भारतात २०२२ मध्ये १३ हजार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. यासाठी परीक्षेतील अपयश हे कारण स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ३७८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. मध्य प्रदेश-२७७ आणि झारखंडमध्ये १७४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.

(हेही वाचा – ED Raid : कुख्यात लॉरेन्स बिश्नोईच्या गँगला धक्का; १३ ठिकाणी ईडीकडून छापे)
महिला अत्याचारात वाढ

देशात महिला अत्याचाराच्या (Increase in Crime) प्रमाणात ४ टक्के वाढ नोंदवण्यात आली. देशात दर तासाला महिलांविरुद्ध ५१ गुन्हे घडतात. २०२२ मध्ये असे ४.४५ लाख गुन्हे दाखल झाले. २०२१ च्या तुलनेत त्यात ४ टक्के वाढ आहे. यामध्ये १९.२ टक्के अपहरण व ७ टक्के अत्याचाराचे गुन्हे आहेत. महिलांच्या संदर्भातील अत्याचाराच्या एकूण ३१ हजार ५१६ घटनांपैकी सर्वाधिक ५३९९ घटना राजस्थानातील आहेत. त्याखालोखाल उत्तरप्रदेशात ३६९० आणि मध्यप्रदेशात महिला अत्याचाराच्या (Increase in Crime) ३०२९ प्रकरणांची नोंद करण्यात आली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.