Mahaparinirvana Din : डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पाऊलखुणा' चे प्रकाशन करण्यात आले.

450
Mahaparinirvana Din : डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती पुस्तिकेचे प्रकाशन
Mahaparinirvana Din : डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvana Din) मुंबई महानगरपालिकेतर्फे (BMC) तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर, उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार यांच्या हस्ते दादर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात मंगळवारी ५ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले. (Mahaparinirvana Din)

‘जागतिक पाऊलखुणा’

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा ६७ वा महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvana Din) उद्या बुधवारी ६ डिसेंबर, २०२३ रोजी आहे. त्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्‍या प्रेरणादायी कार्याची, तसेच महापरिनिर्वाण दिन तयारीबाबतची माहिती देणारी पुस्तिका ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पाऊलखुणा’ चे प्रकाशन करण्यात आले. महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने ही पुस्तिका तयार केली आहे. तर महानगरपालिकेच्या भायखळा येथील महानगरपालिका मुद्रणालयातून या पुस्तिकेचे मुद्रण करण्यात आले आहे. (Mahaparinirvana Din)

(हेही वाचा – Free & Cashless Facility For Road Accidents : रस्ते अपघातातील जखमींवर उपचारासाठी केंद्रसरकार मोफत आणि कॅशलेस योजना आणणार)

New Project 2023 12 05T152816.749

दिशादर्शक फुगा आकाशात

पुस्तक प्रकाशनानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त जोशी यांच्या हस्ते जनसंपर्क विभागातर्फे आयोजित छायाचित्र प्रदर्शन दालनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच दिशादर्शक फुगा आकाशात सोडण्यात आला. महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे, भंते डॉ. राहुल बोधी, महेंद्र साळवे, नागसेन कांबळे, रमेश जाधव, प्रतीक कांबळे, भिकाजी कांबळे, प्रकाश जाधव यांच्यासह अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Mahaparinirvana Din)

New Project 2023 12 05T152924.591

देशभरातून लाखो अनुयायी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दरवर्षी मुंबईतील चैत्यभूमी परिसरात येतात. त्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने निरनिराळ्या नागरी सेवा-सुविधा पुरवल्या जातात. या सेवा-सुविधांचा तपशील असलेली तसेच डॉ. बाबासाहेब (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जीवन कार्यावर आधारित माहिती संकलित असलेली पुस्तिका त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे प्रकाशित करण्यात येते. या पुस्तिकेचे विनामूल्य वितरण अनुयायांना करण्यात येते. (Mahaparinirvana Din)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.