इस्रायली सैन्य गाझामधील हमासच्या (Hamas) बोगद्यांमध्ये भूमध्य समुद्राचे पाणी सोडण्याच्या तयारीत आहे. यासाठी गाझामधील अल्-शाती रुग्णालयाजवळ ५ मोठे पाण्याचे पंप बसवण्यात आले आहेत. असे वृत्त अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केले आहे. पंपांद्वारे प्रत्येक तासाला हजारो घनमीटर पाणी बोगद्यांमध्ये सोडले जाणार आहे. याविषयी अमेरिकाला यापूर्वीच कल्पना देण्यात आली आहे. (Israil Hamas War)
(हेही वाचा – Sukhdev Singh Gogamedi : करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांची भर दिवसा घरात घुसून हत्या)
इस्रायलने गाझा (Gaza) येथील हमासच्या ‘कोर्ट जस्टिस पॅलेस’वर नियंत्रण मिळवले आणि तो उद्ध्वस्त केले. आतापर्यंत गाझामध्ये १५ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून यात हमासचे ५ हजार आतंकवादी आहेत.
बंदुकीच्या परवान्यांसाठी इस्रायलींची वाढती संख्या !
इस्रायलमध्ये बंदुकीच्या परवान्यांची (Gun licenses) मागणी अनेक पटींनी वाढली आहे. राष्ट्रीय सुरक्षामंत्री इटामार बेन गिवीर यांनी दिलेल्या माहितीनुसार ७ ऑक्टोबरनंतर २ लाख ६० हजार इस्रायली नागरिकांनी बंदुकीच्या परवान्यांसाठी अर्ज केले आहेत. गिवीर म्हणाले की, माझा प्रयत्न आहे की, अधिकाधिक इस्रायलींकडे संरक्षणासाठी शस्त्रे असावीत. सरकार अतिशय वेगाने काम करत असून आम्ही प्रतिदिन ३ सहस्र लोकांना बंदुकीचा परवाना संमत करत आहोत. यापूर्वी ते १०० पेक्षा अल्प होते.
दुसरीकडे, इस्रायलने खान युनिस आणि दक्षिण गाझामधील इतर भागांवर हल्ले तीव्र केले आहेत. इस्त्रायली लष्कर IDF ने म्हटले आहे की, 7 दिवसांच्या युद्धविरामादरम्यान (Armistice) त्यांचे सैनिक युद्धासाठी तयार होते. उत्तरेनंतर ते आता दक्षिण गाझामध्येही हमासचा नाश करण्याच्या तयारीत आहेत.
(हेही वाचा – Ananda Matthew : जगातील सर्व समस्यांचे उत्तर सनातन धर्मात आहे ! – आनंदा मॅथ्यू)
इस्रायलच्या चॅनल 12 न्यूजने आपल्या एका अहवालात हमास जुलै 2022 मध्ये मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याचे वृत्त दिले होते. गुप्तचर अधिकाऱ्यांच्या सादरीकरणात हमासच्या 20 तुकड्या दक्षिण इस्रायलवर हल्ला करतांना दिसल्या. सीमेवरील कुंपण तोडण्यात मदत करणारे अभियंतेही हमास (Hamas) आपल्यासोबत आणतील, असे या अहवालात म्हटले आहे. (Israil Hamas War)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community