-
ऋजुता लुकतुके
सहकारी बँकांमधील आर्थिक अनियमितता हा बँकिंग व्यवस्थेचा एक मोठा प्रश्न आहे आणि त्यासाठी कोल्हापूरातील आणखी एका बँकेचा परवाना मध्यवर्ती बँकेनं रद्द केला आहे. (Banking License Canceled)
रिझर्व्ह बँकेनं सोमवारी कोल्हापूरमधील शंकरराव पुजारी नूतन सहकारी बँक लिमिटेड या बँकेचा परवाना रद्द करताना ४ डिसेंबरला बँक बंद झाल्यानंतर बँकेनं कुठलेही आर्थिक व्यवहार करण्यावर बंदी घातली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी इथं बँकेचं मुख्य कार्यालय आहे. (Banking License Canceled)
‘शंकरराव पुजारी नूतन सहकारी बँकेनं ४ डिसेंबरला बँक बंद झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचे बँकिंग व्यवहार करू नयेत, यात ठेवी स्वीकारणे आणि ठेवींवर परतावा देणं या क्रियांचाही समावेश असेल. बँकिंग नियामक कायद्याच्या कलम ५६ नुसार ही कारवाई करण्यात येत आहे,’ असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. (Banking License Canceled)
बँकेकडे सध्या पुरेसं भांडवल नाही आणि ठेवीदारांचे पैसे परत करण्याची क्षमताही नाही. शिवाय येत्या काळात परिस्थिती सुधारण्याची शक्यता नाही. त्यामुळे ठेवीदारांचं हित लक्षात घेऊन ही कारवाई करत असल्याचं मध्यवर्ती बँकेनं म्हटलं आहे. (Banking License Canceled)
(हेही वाचा – Mahaparinirvana Din : डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती पुस्तिकेचे प्रकाशन)
शंकर पुजारी सहकारी बँकेनं रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं पालन केलेलं नाही. त्यामुळे मध्यवर्ती बँकेला कारभारात लक्ष घालावं लागलं, असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. आता बँकेची इतर मालमत्ता आणि ठेवीदारांचे अडकलेले पैसे यांचं काय करणार हे सांगताना बँकेवर लिक्विडेशन अधिकारी नेमण्याची कारवाई करण्यात आली असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. (Banking License Canceled)
सुदैवाने ज्या ठेवीदारांचे पैसे बँकेत अडकले आहेत, त्यांना मुदतठेवींवर आणि बचत खात्यातील ठेवींवर मिळणाऱ्या विमा योजनेचा लाभ घेत आपले पैसे परत घेता येतील. ही प्रक्रियाही सुरू झाली आहे. (Banking License Canceled)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community