राजस्थानातील पराभवानंतर आता Ashok Gehlot आले अडचणीत

295

राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर आता अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्यावर अशोक गहलोत मुख्यमंत्री असताना त्यांचे विशेष कार्य अधिकारी लोकेश शर्मा यांनी गंभीर आरोप केला.

शर्मा यांनी काय केला आरोप? 

जो निवडणूक निकाल आला, त्यामुळे मी निराश नक्कीच आहे, मात्र मला या निकालाचे आश्चर्य अजिबात वाटले नाही. काँग्रेस पक्ष पुन्हा सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करत होता, पण अशोक गहलोत हे मात्र कोणताही बदल करण्याच्या मनस्थितीत नव्हते. हा काँग्रेस नव्हे तर केवळ गहलोत यांचा पराभव आहे. गहलोत (Ashok Gehlot) यांच्याकडून पक्षनेतृत्वाची फसवणूक, त्यांना योग्य फीडबॅक न देणे, पर्याय म्हणून कोणालाही तयार न होऊ देणं, अपरिपक्व आणि फक्त स्वत:च्या फायद्यासाठी जवळ असलेल्या लोकांचं ऐकून चुकीचे निर्णय घेणं, पराभूत होण्याची शक्यता असणाऱ्या उमेदवारांनाच तिकिटं दिली जात होती, असा हल्लाबोल शर्मा यांनी केला आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात पक्षाचे नेते सचिन पायलट यांच्या हालचालींवर बारिक नजर ठेवली जात होती आणि त्यांचा फोनही टॅप केला जात होता. मी स्वत:ही गावखेड्यात जाऊन लोकांशी संवाद साधत काही महिन्यांपूर्वी एक रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना दिला होता. मात्र त्यावर त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. पक्षसंघटनेत कसलाही बदल केला नाही, असा दावाही लोकेश शर्मा यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.