-
ऋजुता लुकतुके
लँबॉर्गिनीची रिवेल्टो (Lamborghini Revuelto) ही लक्झरी गाडी भारतात डिसेंबरमध्ये दाखल होत आहे आणि तिची किंमत आहे तब्बल १० कोटी रुपये. (Lamborghini Revuelto)
लँबॉर्गिनी (Lamborghini) या ब्रँड नावाला साजेसं डिझाईन असलेली आणि कंपनीची अत्याधुनिक गाडी असलेली रिवेल्टो भारतात दाखल होत आहे आणि गाडीचं कमीत कमी किंमत ८ कोटी रुपये तर टॉप मॉडेलची किंमत १० कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल, असं या गाडीत नेमकं काय आहे? (Lamborghini Revuelto)
सर्व लँबॉर्गिनी (Lamborghini) गाड्यांचा असतो तसा ‘वेज शेप’ आकार या गाडीचाही आहे. गाडीचे पुढे आणि मागे असलेले बंपर तरुणांना आकर्षित करतील असे आहेत. गाडीचे प्रसिद्ध सिझर्स दरवाजे या गाडीलाही आहेत. गाडीच्या इंटिरिअर बद्दल बोलायचं झाल्यास गाडीत तीन डिस्प्ले युनिट्स आहेत. यात ८.४ इंचांचा डिस्प्ले हा इन्फोटेनमेंटसाठी आहे. चालकाचा डिस्प्ले १२.३ इंचांचा आहे. तर प्रवाशांसाठीही ९.१ इंचांचा डिस्प्ले आहे. (Lamborghini Revuelto)
The all-new Lamborghini Revuelto in all its glory! pic.twitter.com/upPp7EBa7u
— MotorOctane (@MotorOctane) March 29, 2023
इंजिन बद्दल बोलायचं झाल्यास गाडीत नवीन ६.५ लीटर एमए व्ही१२ इंजिन बसवण्यात आलं आहे आणि त्याच्याबरोबर आहेत ३ इलेक्ट्रिक मोटर्स. तर बॅटरी पॅक आहे ३.८ केडब्ल्यूएच. या इंजिनमधून ८२५ बीएचपी इतकी ऊर्जा निर्माण होऊ शकते. तर गाडीत ८ स्पीडची डुआल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन यंत्रणाही आहे. (Lamborghini Revuelto)
लँबॉर्गिनी रिवोल्टोची (Lamborghini Revuelto) स्पर्धा असेल ती फेरारी एसएफ९० स्ट्रेडेल या गाडीशी. (Lamborghini Revuelto)
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community