Special 26 : आयकर अधिकारी बनून १८ लाखांची लूट, ८ तोतया आयकर अधिकाऱ्यांना अटक

याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी ४८ तासांत या गुन्ह्याचा छडा लावून ८ तोतया आयकर अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

412
Special 26 : आयकर अधिकारी बनून १८ लाखांची लूट, ८ तोतया आयकर अधिकाऱ्यांना अटक
Special 26 : आयकर अधिकारी बनून १८ लाखांची लूट, ८ तोतया आयकर अधिकाऱ्यांना अटक

‘स्पेशल २६’ (Special 26 movie) या चित्रपटातून प्रेरणा घेऊन ८ जणांच्या एका टोळीने आयकर अधिकारी बनून एका इमिटेशन ज्वेलरी व्यवसायिकाच्या घरावर छापा टाकून या व्यवसायिकाने मुलीच्या लग्नासाठी जमवलेली १८ लाख रुपयांच्या रोकडसह घेऊन पोबारा केल्याची घटना २६/११ च्या दिवशी सायन येथे घडली होती. याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी ४८ तासांत या गुन्ह्याचा छडा लावून ८ तोतया आयकर अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या टोळीजवळून पोलिसांनी आयकर विभागाची दोन ओळखपत्रे जप्त केली आहे. (Special 26)

संतोष पटले (३३), राजाराम मांगले (४७), अमरदीप सोनवणे (२९), भाऊराव इंगळे (५२), सुशांत लोहार (३३), शरद एकावडे (३३), अभय कासले (३३) आणि रामकुमार गुजर (३८) अशी अटक करण्यात आलेल्या तोतया आयकर अधिकाऱ्यांची नावे आहेत. मानखुर्द, नवी मुंबई परिसरातून या टोळीला अटक करण्यात आली आहे. सायन पूर्व येथे राहणारे तक्रारदार पटवा यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय आहे. २६ नोव्हेंबर रोजी पटवा यांच्या घरी ४ इसम आले व यांनी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे ओळख पत्र दाखवून आयकर विभागाकडून आलो असल्याचे सांगून तुमच्या घराची झडती घ्यायची असे सांगितले. (Special 26)

त्यानंतर या चौघांनी घरातील सर्वाचे मोबाईल फोन ताब्यात घेतले, घरातील टेलिफोन बंद करून घराची झडती सुरु केली. कपाटातील कागदपत्रे दागिने तपात असताना पटवा यांनी मुलीच्या लग्नासाठी जमवलेली १८ लाख रुपयाची रोकड आढळून आली असता तुम्ही एवढी रोकड घरात ठेवू शकत नाही, एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम घरात ठेवल्यामुळे तुम्हाला या पैशाचा हिशोब द्यावा लागेल, असे सांगून पटवा कुटुंबाची १८ लाख रुपयाची रोकड पसार झाले. (Special 26)

आयकर विभागाचा (Income Tax Department) छापा पडल्यामुळे पटवा कुटुंब घाबरले होते, दोन दिवसांनी त्यांनी याबाबत चौकशी केली असता आपल्याकडे पडलेला छापा हा आयकर विभागाकडून नव्हता तर आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी सायन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. सायन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला असता पोलीस पथकाला तोतया आयकर अधिकाऱ्यांनी वापरलेल्या मोटारीचा क्रमांक सीसीटीव्हीमध्ये मिळून आला. पोलीस पथकाने या मोटारीचा शोध घेतला असता ही मोटार मानखुर्द महाराष्ट्र नगर येथे राहणाऱ्या एका महिलेच्या नावावर असल्याची माहिती मिळाली. दरम्यान पोलिसांनी या महिलेकडे चौकशी केली असता इन्व्होवा ही मोटार तिचे पती राजाराम मांगले हे वापरत असल्याचे कळाले. (Special 26)

(हेही वाचा – MHADA Layout : म्हाडा वसाहतीमधील मलवाहिन्यांची क्षमता वाढवणार)

पोलिसांनी राजाराम मांगलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत, या गुन्ह्यात असलेल्या इतरांची नावे पोलिसांना दिली. सायन पोलिसांनी (Sion Police) या प्रकरणात ८ जणांना अटक करून त्यांचेकडे चौकशी केली असता या गुन्ह्यातील मास्टरमाइंड हा सुशांत लोहार आहे. सुशांत लोहार हा वाहन चालक असून त्याने अभय कासले याला आयकर विभागात कामाला असल्याची सांगितले होते. (Special 26)

दरम्यान, अटकेत असलेला गुजर हा आरोपी तक्रारदार पटवा यांच्या मुलाचा मित्र असून पटवा यांनी गावाकडील जमीन विकून त्यांना १० कोटी रुपये मिळाले आहे आणि ते त्यांनी घरात ठेवले असल्याची माहिती मिळाली होती. गुजरने ही माहिती कसले याला दिली. ही माहिती आयकर विभागाला (Income Tax Department) दिल्यावर आपल्याला १० टक्के कमिशन मिळेल म्हणून कासलेने ही माहिती लोहार याला दिली. लोहार याने योजना आखून स्पेशल २६ या चित्रपटात दाखविल्या प्रमाणे एक टीम तयार करून पटवा यांच्या घरी आयकर अधिकारी म्हणून छापा टाकून १८ लाख रुपयाची रोकडसह पोबारा केला होता. अटक करण्यात आठही जणांनी १८ लाखाची आपापसात समान वाटणी केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Special 26)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.