Chandrayan-4: इस्रोची चंद्रयान-४ची तयारी सुरू, मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्याचे उद्दिष्ट

पृथ्वीच्या निरीक्षणासाठी 'प्रपोल्शन मॉड्युल'ला पृथ्वीच्या योग्य कक्षेत पुन्हा फिरते ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

236
Chandrayan-4: इस्रोची चंद्रयान-४ची तयारी सुरू, मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्याचे उद्दिष्ट
Chandrayan-4: इस्रोची चंद्रयान-४ची तयारी सुरू, मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्याचे उद्दिष्ट

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चंद्रयान-४च्या (Chandrayan-4) तयारीला लागली आहे. या मोहिमेअंतर्गत चंद्रावरील मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याची रंगीत तालीम म्हणून ‘इस्रो’कडून चांद्रयान-३चे प्रोपल्शन मॉड्युल (पीएम) चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत आणण्याची अनोखी कामगिरी पार पाडली.

चांद्रयान-३ मोहिमेची उद्दिष्टे साध्य झाली आहेत. प्रोपल्शन मॉड्युलचा प्राथमिक उद्देश लँडर मॉ़ड्युलला स्थिर कक्षेपासून चंद्राच्या ध्रृवीय वर्तुळाकार कक्षेत नेणे आणि लँडर वेगळे करणे होता, तेदेखील यशस्वी झाला.

(हेही वाचा – Navi Mumbai: नवी मुंबईत २ दिवसांत ६ मुले बेपत्ता, पालकांमध्ये भीतीचे वातावरण)

अतिरिक्त इंधनाचा वापर…
चंद्राच्या कक्षेत एक महिन्याहून अधिक काळ काम केल्यानंतर प्रपोल्शन मॉड्युलमध्ये १०० किलोपेक्षा अधिक इंधन उपलब्ध होते. त्यामुळे भविष्यातील मोहिमांसाठी अतिरिक्त माहिती गोळा करण्यासाठी हे इंधन वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परतीच्या योजनेचे नियोजन का ?
पृथ्वीच्या निरीक्षणासाठी ‘प्रपोल्शन मॉड्युल’ला पृथ्वीच्या योग्य कक्षेत पुन्हा फिरते ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मॉडुयलला चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळण्यापासून रोखणे किंवा पृथ्वीच्या कक्षेत ३६००० किमी आणि त्याखालील कक्षेमध्ये प्रवेश करण्यासाठी परतीची योजना तयार केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.