Rajsthan : एकाही रोहिंग्या किंवा बांगलादेशी घुसखोराला राजस्थानमध्ये राहू देणार नाही – आमदार बालमुकुंद आचार्य

225

राजस्थान (Rajsthan)  विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर भाजपचे जयपूरमधील हवामहल मतदारसंघातून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार बालमुकुंद आचार्य यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यामध्ये त्यांनी ‘एकाही रोहिंग्या किंवा बांगलादेशी घुसखोराला राजस्थानमध्ये राहू देणार नाही’, असे म्हटले आहे. आचार्य बालमुकुंद यांनी काँग्रेसचे आर्.आर्. तिवारी यांचा पराभव करून विजय मिळवला आहे.

अवैध मांसाहाराची दुकाने बंद करण्याचा दिला आदेश 

Rajsthan तील जयपूरमधील हवामहल मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार बालमुकुंद आचार्य यांनी दुसरा एक व्हिडिओ प्रसारित केला असून त्यामध्ये अवैध मांसाहाराची दुकाने बंद करण्याचा आदेश दिला आहे. आमदाराच्या मागणीची कार्यवाही करण्यासाठी पोलिसांनी २ दिवसांचा अवधी मागितला आहे. आचार्य बालमुकुंद यांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून त्यात त्यांनी, ‘माझ्या परिसरात बेकायदेशीर मांसाहाराची दुकाने चालू देणार नाही’, अशी घोषणा केली आहे.

(हेही वाचा Hindu : शाळेच्या बाकावर ‘जय श्री राम’ लिहिले म्हणून ख्रिस्ती शिक्षिकेने विद्यार्थ्याचा चेहरा व्हाइटनरने रंगवला; हिंदुत्ववाद्यांच्या विरोधामुळे कारवाई )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.