Water Pipeline : जलवाहिनीला हानी पोहोचवणाऱ्या ‘त्या’ कंत्राटदाराला सुमारे सव्वा कोटींचा दंड

स्थायी समितीने २०१५मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार महापालिकेने जलवाहिनीला नुकसान पोहाचवणाऱ्या कंपनीकडून याच्या दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी ४ डिसेंबर रोजी नोटीस जारी केली आहे.

1127
Water Pipeline : जलवाहिनीला हानी पोहोचवणाऱ्या 'त्या' कंत्राटदाराला सुमारे सव्वा कोटींचा दंड
Water Pipeline : जलवाहिनीला हानी पोहोचवणाऱ्या 'त्या' कंत्राटदाराला सुमारे सव्वा कोटींचा दंड

मेट्रो प्रकल्पाचे (Metro project) ड्रिलिंग काम सुरु असताना या जलवाहिनीला हानी पोहोचवल्यामुळे मेट्रो रेल्वे (Metro Rail), एमआरडीए (MMRDA) आणि संबंधित कंत्राटदार असलेल्या ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड (Eagle Infra India Limited Company) या कंपनीला महापालिकेच्यावतीने नोटीस जारी करून तब्बल १ कोटी ३३ लाख ६२ हजार ४१२ रुपयांचा दंड आकारला आहे. या दंडाची सर्व रक्कम ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड (Eagle Infra India Limited Company) या कंपनीकडून वसूल करून याची रितसर पावती महापालिकेला सादर करण्यात यावी अशाप्रकारची सूचना या संबंधित कंपनीसह एमएमआरडीए (MMRDA) आणि मेट्रो रेल्वे (Metro Rail) प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. (Water Pipeline)

अंधेरी पूर्व येथे वेरावली-३ सेवा जलाशयाला पाणीपुरवठा करणाऱ्या, १८०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला जेव्हीएलआर येथील सारीपूत नगर येथे मेट्रो लाईन सहा या प्रकल्पाचे ड्रिलिंग काम सुरु असताना ३० नोव्हेंबर २०२३ रोजी हानी पोहोचवली होती. त्यामुळे जलवाहिनीत गळती निर्माण झाली होती. या गळतीमुळे पश्चिम उपनगरासह पूर्व उपनगरातील अनेक भागांमध्ये पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली होती मेट्रो प्रकल्पाचे (Metro project) ड्रिलिंग काम सुरु असताना या जलवाहिनीला हानी पोहोचून गळती लागली होती ही गळती तब्बल ५० तासांच्या अथक प्रयत्नानंतर दूर करण्यात आली. दरम्यान ४ डिसेंबर रोजी या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या (Metro Rail Project) या भागाचे काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदार कंपनी असलेल्या ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड यांच्यासह एमएमआरडीच्या (MMRDA) मुंबई मेट्रो रेल्वेचे संचालक (प्रकल्प) यांना महापालिकेने नोटीस जारी करून दंडाची रक्कम आकारली आहे. (Water Pipeline)

(हेही वाचा – Water Pipeline : जलवाहिनीला हानी पोहोचवणाऱ्या मेट्रोच्या ‘त्या’ कंत्राटदाराला महापालिकेची नोटीस)

स्थायी समितीने २०१५ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार महापालिकेने जलवाहिनीला नुकसान पोहाचवणाऱ्या कंपनीकडून याच्या दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी ४ डिसेंबर रोजी नोटीस जारी केली आहे. ज्यामध्ये पाणी वाहून गेल्याने त्याबाबतचे शुल्क म्हणून २८ लाख २० हजा ८३० रुपये, जलवाहिनी दुरुस्तीचा (Aqueduct repair) खर्च ६० लाख ८७ हजार ४४३ रुपये, अधिक या एकूण रकमेवर ५० टक्के दंडाची रक्कम म्हणून ४४ लाख ५४ हजार १३७ रुपये अशाप्रकारे सर्व प्रकारचा खर्च आणि दंडाची रक्कम म्हणून १ कोटी ३३ लाख ६२ हजार ४१२ रुपयांची वसुली करण्यात येणार असून याबाबतच्या खर्चाची आकारणीच संबंधित ईगल इन्फ्रा इंडिया कंपनीला (Eagle Infra India Limited Company) करण्यात आली आहे. (Water Pipeline)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.