Dhananjay Munde : आमच्यातील संघर्ष संपला; पंकजा मुंडेंचे नाव घेत धनंजय मुंडेंनी केले जाहीर

463
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजपा व शिवसेनेसोबत सरकारमध्ये आल्यानंतर आमच्यात जो काही राजकीय संघर्ष होता तो संपला. ते मनभेद नव्हते, राजकीय मतभेद होते. राजकारणात त्या वेळी आम्ही एकमेकांच्या विरोधात विचारांनी वेगळे होतो. आता महायुतीच्या माध्यमातून हे सर्व विचार एकत्र आल्यानंतर आमच्या बहीण-भावामध्ये अंतर पडायचे कारण नाही. आम्ही याआधीही वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलो. पण ज्या मजबुतीने जिल्ह्याचे नेतृत्व व्यासपीठावर आज पाहायला मिळाले, त्याचा आनंद सगळ्यांनाच होता, असे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे आता बीडमधील धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष संपल्याचे स्पष्ट झाले आहे. आता दोघेही आगामी काळात एकत्र महायुतीचा प्रचार करताना दिसण्याची शक्यता आहे. बीडच्या परळीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पण त्यांच्यासमवेतच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) व त्यांच्या भगिनी, तसेच भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे याही एकाच व्यासपीठावर उपस्थित होत्या. त्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आल्याचे  पाहायला मिळाले. या दोघांनीही एकमेकांचा उल्लेख करत एकत्र बीडचा विकास करण्यासाठी काम करण्याची तयारी दर्शवल्यानंतर या चर्चेला अधिकच ऊत आला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.